वाकचौरे यांची भाजपतून हकालपट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 06:17 AM2019-04-18T06:17:25+5:302019-04-18T06:17:29+5:30

शिर्डी लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार व माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांची भाजपमधून हकालपट्टी करण्यात आली आहे.

 Wachchoure's expulsion from the BJP | वाकचौरे यांची भाजपतून हकालपट्टी

वाकचौरे यांची भाजपतून हकालपट्टी

Next

अहमदनगर : शिर्डी लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार व माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांची भाजपमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. महायुतीचा उमेदवार असताना वाकचौरे यांनी बंडखोरी करून निवडणूक लढवित असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या आदेशान्वये वाकचौरे यांच्यावर बुधवारी ही कारवाई करण्यात आली. शिर्डी लोकसभा ही युतीच्या कोट्यात शिवसेनेला आहे. खासदार सदाशिव लोखंडे हे सेनेकडून निवडणूक लढवित असताना वाकचौरे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. राज्यमंत्री दादा भुसे व संपर्क प्रमुख आमदार नरेंद्र दराडे यांनी वाकचौरे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी थेट मुख्यमंत्र्यांकडे केली होती. तसेच भाजपच्या कार्यकर्त्यांनीही वाकचौरे यांचे काम न करण्याचा निर्णय घेतला होता.

Web Title:  Wachchoure's expulsion from the BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.