शिवसेना खासदारांत अस्वस्थता, की षडयंत्र ?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2019 06:32 AM2019-01-22T06:32:33+5:302019-01-22T06:35:03+5:30

येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपासोबत युती करण्यावरून शिवसेनेत खदखद असून ‘युती करा, अन्यथा आम्हाला उमेदवारी नको’, अशी भूमिका काही खासदारांनी घेतली असल्याचे समजते.

Shiv Sena MPs, unrest, the conspiracy? | शिवसेना खासदारांत अस्वस्थता, की षडयंत्र ?

शिवसेना खासदारांत अस्वस्थता, की षडयंत्र ?

Next

मुंबई : येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपासोबत युती करण्यावरून शिवसेनेत खदखद असून ‘युती करा, अन्यथा आम्हाला उमेदवारी नको’, अशी भूमिका काही खासदारांनी घेतली असल्याचे समजते. मात्र, शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार शिवाजीराव आढळराव यांनी याचा
इन्कार केला असून आमच्या विरोधात कोणीतरी षडयंत्र करीत आहे, असा आरोप त्यांनी केला.
भाजपा-शिवसेना युतीची शक्यता दुरावत चालल्यामुळे दोन्ही पक्षात अस्वस्थता आहे. विशेषत: दोन्ही पक्षाचे विद्यमान खासदार-आमदार युतीसाठी आग्रही आहेत. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत शिवसेनेचे १८ तर भाजपाचे २४ खासदार निवडून आले. युती झाली नाही, तर ही संख्या कमी होईल, अशी भीती काही नेते खासगीत व्यक्त करत आहेत.
शिवाजीराव आढळराव पाटील (शिरुर), चंद्रकांत खैरे (औरंगाबाद) आणि अमरावतीचे आनंदराव अडसूळ हे तीन सेना खासदार युतीसाठी आग्रही आहेत. ‘मातोश्री’वर जाऊन ते आपली भूमिका मांडणार होते. त्यासाठी ते आणखी काही खासदारांची जुळवाजुळव करण्याच्या प्रयत्नात होते. मात्र त्याआधीच ‘बातमी’ फुटल्याने प्रयत्न फसला, अशी चर्चा आहे.
मात्र स्वत: खैरे आणि पाटील यांनी याचा इन्कार केला आहे. खा.पाटील म्हणाले, शिवसेनेच्या कोणत्याही खासदाराने अशी मागणी केली नाही. युती व्हावी ही आमची इच्छा आहे. युती झाल्यास उत्तमच होईल, धावपळ कमी होईल. परंतु, या बाबतचा निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घ्यायचा आहे. पक्षनेतृत्वाला आव्हान देण्याची कोणाचीही हिंमत नाही. उद्धवजी जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल, असे खा. खैरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
>युती व्हावी असे आम्हाला वाटते, पण समजा नाही झाली तरी आम्ही लढू आणि जिंकूदेखील. युतीसाठी आम्ही पक्षनेतृत्वावर कोणताही दबाव वगैरे आणलेला नाही. उद्धवजींवर आम्ही दबाव कसा आणणार? ते आमचे नेते आहेत.
- खा. शिवाजीराव आढळराव पाटील, शिवसेना.

Web Title: Shiv Sena MPs, unrest, the conspiracy?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.