"दलित मतांच्या धुव्रीकरणाच्या षडयंत्रासाठीच भाजपाकडून भीम आर्मीची स्थापना"

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2019 03:10 PM2019-03-31T15:10:29+5:302019-03-31T15:11:28+5:30

बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

lucknow bsp mayawati tweet says bhim army has been created under conspiracy | "दलित मतांच्या धुव्रीकरणाच्या षडयंत्रासाठीच भाजपाकडून भीम आर्मीची स्थापना"

"दलित मतांच्या धुव्रीकरणाच्या षडयंत्रासाठीच भाजपाकडून भीम आर्मीची स्थापना"

नवी दिल्ली- बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. दलितांच्या मतांचं ध्रुवीकरण व्हावे, यासाठीच भाजपानं षडयंत्र रचून भीम आर्मीची स्थापना केली आहे. भाजपानं दलितांची मतं बसपाऐवजी भीम आर्मीला मिळावीत म्हणून चंद्रशेखर यांना वाराणसीतून निवडणूक लढवण्यास सांगितलं आहे, असा आरोप मायावतींनी केला आहे. भीम आर्मीची स्थापना ही दलितांच्या मतांचं धुव्रीकरण करण्याच्या षड्यंत्रातून झालेली आहे.

मायावतींनी रविवारी ट्विट करत भाजपाआडून चंद्रशेखर आझाद यांच्यावर निशाणा साधला आहे. दलितांच्या मतांचं ध्रुवीकरण करून भाजपाला फायदा व्हावा या उद्देशानंही भाजपानं भीम आर्मीच्या चंद्रशेखर यांना वाराणसीतून निवडणूक लढवण्यास सांगितलं आहे. ही संघटना भाजपानं षड्यंत्रानं बनवली आहे. भाजपा दलितविरोधी मानसिकतेचं घाणेरडं राजकारण करत असल्याची टीकाही मायावतींनी केली आहे. तर दुसऱ्या एका ट्विटमध्ये मायावतींनी भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. भाजपानं गुप्तचर म्हणून चंद्रशेखर यांना बीएसपीमध्ये पाठवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्यांचं षडयंत्र यशस्वी झालं नाही. अहंकारी, निरंकुश आणि जातीयवादी भाजपाला सत्तेतून हटवण्यासाठी आपलं एक एक मत बहुमूल्य असल्याचंही मायावती मतदारांना उद्देशून म्हणाल्या आहेत.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांनीसुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात वाराणसी मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याची घोषणा केली होती. महाआघाडी मोदींविरोधात आव्हान उभं करू शकत नाही म्हणून मी उभं राहण्याचा निर्णय घेतला असल्याचं आझाद यांनी म्हटलं होतं.  मोदींना पराभूत करून त्यांची गुजरातला रवानगी करणार असल्याचे आझाद यांनी म्हटले होते. पंतप्रधान मोदी यांच्याविरुद्ध आपण वाराणसीतून संघटनेतील मजबूत व्यक्ती उभा करणार आहोत. परंतु योग्य उमेदवार न मिळाल्यास खुद्द मोदी यांच्याविरुद्ध निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे आझाद यांनी स्पष्ट केले होते. 

Web Title: lucknow bsp mayawati tweet says bhim army has been created under conspiracy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.