VIDEO- 'कमळ, कमळ'नंतर 'नमो नमो'चा जप; भाजपाचा ब्रेथलेस नेता थांबेना!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2019 01:31 PM2019-04-08T13:31:38+5:302019-04-08T13:34:43+5:30

लोकसभा निवडणूक 2019च्या निवडणुकीच्या प्रचाराची रंगत वाढत चालली आहे.

kamal kamal chant in public meeting bjp leader vineet sharda new video viral namo namo namo | VIDEO- 'कमळ, कमळ'नंतर 'नमो नमो'चा जप; भाजपाचा ब्रेथलेस नेता थांबेना!

VIDEO- 'कमळ, कमळ'नंतर 'नमो नमो'चा जप; भाजपाचा ब्रेथलेस नेता थांबेना!

googlenewsNext

नवी दिल्लीः लोकसभा निवडणूक 2019च्या निवडणुकीच्या प्रचाराची रंगत वाढत चालली आहे. निवडणुकीत राजकीय नेत्यांच्या एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाबरोबरच मनोरंजनात्मक घटना पाहायला मिळत आहे. अनेक नेते स्वतःच्या भाषण देण्याच्या शैलीमुळे चर्चेत आले आहेत. त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण अंदाजामुळेच ते नेते चर्चेत आहेत. भाजपा नेते विनित अग्रवाल शारदाही अशाच एका अंदाजामुळे चर्चेत असतात.

भाजपा नेते विनित शारदा यांच्या बोलण्याची गती एवढी तीव्र आहे की, ती ऐकणाऱ्याला बुचकळ्यात टाकू शकते. विनित शारदा यांचा असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरतोय. या व्हिडीओमध्ये ते नमो, नमो असं तीव्रतेनं बोलताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच कमळ, कमळ बोलतानाचाही भाजपा नेत्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. गेल्या आठवड्यात मेरठमध्ये झालेल्या एका रॅलीमध्ये विनीत शारदा यांनी लोकांना भाजपाला मतदान करण्याचं आवाहन करताना 36 सेकंदांत वारंवार कमळ हा शब्द उच्चारला आहे.


'कमळा'लाच मत देण्याचं आवाहन करताना या उत्साही नेत्यानं 17 सेकंदांत 27 वेळा कमळ, कमळ, कमळ, असं म्हटलं आहे. त्याला धाप लागली, पण तो थांबला नाही. या भाषणाची व्हिडीओ क्लिप व्हायरल झालीय. त्यातील नेत्याचा आविर्भाव पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. सुरुवातीला 17 सेकंदांत 27 वेळा कमळ म्हणणाऱ्या विनित अग्रवाल शारदा यांनी शेवटच्या 18 सेकंदांतही 6 वेळा कमळ शब्द उच्चारला. कमळासमोरचं बटण इतक्यांदा दाबा की मोदी रामाच्या रूपात प्रकट झाले पाहिजेत, असं अजब आवाहनही त्यांनी केलं. ते ऐकून सगळेच चक्रावले. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य हेही यावेळी उपस्थित होते.

 

Web Title: kamal kamal chant in public meeting bjp leader vineet sharda new video viral namo namo namo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.