'मी मुंबईकर आहे' याचं मला कोणालाही प्रमाणपत्र देण्याची गरज नाही – ऊर्मिला मातोंडकर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2019 08:41 PM2019-03-29T20:41:25+5:302019-03-29T20:41:49+5:30

ऊर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून, त्या मुंबई उत्तर मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. 

I do not have to give certificates to anyone - 'I am Mumbaikar' - Urmila Matondkar | 'मी मुंबईकर आहे' याचं मला कोणालाही प्रमाणपत्र देण्याची गरज नाही – ऊर्मिला मातोंडकर

'मी मुंबईकर आहे' याचं मला कोणालाही प्रमाणपत्र देण्याची गरज नाही – ऊर्मिला मातोंडकर

Next

मुंबई- ऊर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून, त्या मुंबई उत्तर मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. आता त्यांच्यावर भाजपा नेत्यांकडून टीका करण्यात येत आहे. त्यावर ऊर्मिला यांनीही स्पष्टीकरण दिलं आहे. ‘मी मुंबईकर आहे’ आणि याआधीही होती आणि यापुढेही राहणार आहे, याबाबत मला कोणालाही प्रमाणपत्र देण्याची गरज नाही. मी स्टार म्हणून ही निवडणूक लढवीत नाही. आपल्या लोकशाहीमध्ये संपूर्ण जनता हीच खरी स्टार आहे. मी काँग्रेसची विचारधारा घेऊन ही निवडणूक लढणार आहे. एक चांगला विचार घेऊन मी ह्या क्षेत्रात उतरलेली आहे, असंही ऊर्मिला मातोंडकर म्हणाली आहे. 

मुंबईमध्ये उत्तर मुंबई हा एक खूप चांगला आणि सुंदर विभाग बनवून दाखवायचा आहे. मला कोणावरही आरोप करायचे नाही आहे. मला ही निवडणूक प्रेमाने आणि मोठ्या मनाने लढवायची आहे, द्वेषाचे राजकारण मला करायचे नाही. निवडणुकीनंतरही मी काँग्रेस पक्षासोबत असणार आहे, असे उद्गार उत्तर मुंबईतील काँग्रेसची उमेदवार आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर यांनी आज बोरिवलीमध्ये काढले. 

काँग्रेस पक्षातर्फे ऊर्मिला मातोंडकर यांना उत्तर मुंबईतून भाजपच्या गोपाळ शेट्टी यांच्या विरोधात उमेदवारी जाहीर करण्यात आली. तेव्हा त्यांनी बोरिवली पश्चिम येथील साईबाबानगरमधील काँग्रेसच्या उत्तर मुंबई कार्यालयाला भेट दिली, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम, मुंबई काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष मिलिंद देवरा, AICC सचिव सोनल पटेल, आमदार अस्लम शेख व नसीम खान, मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस भूषण पाटील व संदेश कोंडविलकर, मुंबई महिला काँग्रेस अध्यक्षा डॉ. अजंता यादव, जिल्हाध्यक्ष अशोक सुत्राळे आणि उत्तर मुंबईचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नगरसेवक उपस्थित होते.

Web Title: I do not have to give certificates to anyone - 'I am Mumbaikar' - Urmila Matondkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.