लोकसभेच्या १० जागा द्या; देवेगौडांची काँग्रेसकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2019 05:53 AM2019-03-07T05:53:56+5:302019-03-07T05:54:13+5:30

आगामी लोकसभा निवडणुकांत कर्नाटकमध्ये काँग्रेसने जनता दल (सेक्यूलर) पक्षाला किमान १० जागा द्याव्यात अशी आग्रही मागणी त्या पक्षाचे प्रमुख एच. डी. देवेगौडा यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे केली.

Give 10 seats for Lok Sabha; Gowda's demand for Congress | लोकसभेच्या १० जागा द्या; देवेगौडांची काँग्रेसकडे मागणी

लोकसभेच्या १० जागा द्या; देवेगौडांची काँग्रेसकडे मागणी

Next

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकांत कर्नाटकमध्ये काँग्रेसने जनता दल (सेक्यूलर) पक्षाला किमान १० जागा द्याव्यात अशी आग्रही मागणी त्या पक्षाचे प्रमुख एच. डी. देवेगौडा यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे केली.
जागावाटपाबाबत या दोन्ही नेत्यांची राहुल गांधींच्या दिल्लीतील निवासस्थानी बुधवारी सुमारे दोन तास बैठक झाली. यावेळी काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, जनता दल (सेक्यूलर)चे सरचिटणीस दानिश अली उपस्थित होते. देवेगौडा यांनी सांगितले की, २८ पैकी १२ जागा मिळाव्या अशी आधी मागणी होती. पण आता किमान १० जागा देण्याची फेरमागणी केली. याचा राहुल गांधी लवकरच निर्णय घेतील.

Web Title: Give 10 seats for Lok Sabha; Gowda's demand for Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.