चौकीदार चोर नव्हे, प्युअर; पुन्हा पीएम होणं शुअर; राजनाथ सिंहांची आठवले स्टाईल बॅटिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2019 13:40 IST2019-03-26T13:38:02+5:302019-03-26T13:40:30+5:30

मोदी पुन्हा पंतप्रधान होतील, राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला विश्वास

Chowkidar chor nahi pure hai says Rajnath Singh in vijay sankalap rally | चौकीदार चोर नव्हे, प्युअर; पुन्हा पीएम होणं शुअर; राजनाथ सिंहांची आठवले स्टाईल बॅटिंग

चौकीदार चोर नव्हे, प्युअर; पुन्हा पीएम होणं शुअर; राजनाथ सिंहांची आठवले स्टाईल बॅटिंग

नवी दिल्ली: भाजपा आणि काँग्रेसमध्ये चौकीदारवरुन चांगलीच जुंपली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी चौकीदार चोर है अशी घोषणा वारंवार केली आहे. त्या टीकेला केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. चौकीदार चोर नाही, तर प्युअर आहे, असं सिंह म्हणाले. भाजपाच्या विजय संकल्प रॅलीत भाषण करताना राजनाथ यांनी मोदी पुन्हा पंतप्रधान होतील, असा विश्वास व्यक्त केला. 

'चौकीदार चोर नहीं, चौकीदार प्युअर है. चौकीदार का दुबारा पीएम बनना शुअर है, देश की समस्याओं का वह ही क्युअर है', असं राजनाथ सिंह भाजपाच्या रॅलीला संबोधित करताना म्हणाले. राफेल लढाऊ विमान खरेदी प्रकरणावरुन राहुल गांधींनी मोदींवर टीका करताना चौकीदार चोर है, असा आरोप केला होता. त्यानंतर चौकीदार चोर है अशी घोषणा देशभरात गाजली. मोदी स्वत:ला चौकीदार म्हणवून घेतात. मात्र ते स्वत:च चोर आहेत, असा खळबळजनक राहुल गांधींनी केला होता. 




राहुल गांधींच्या चौकीदार चोर है या टीकेचा भाजपानं सोशल मीडियावरील प्रचारासाठी वापर केला. भाजपानं सोशल मीडियावर 'मै भी चौकीदार' कॅम्पेन सुरू केलं. मोदींनी ट्विटरवर स्वत:च्या नावापुढे चौकीदार शब्द जोडला. त्यानंतर भाजपाचे केंद्रीय मंत्री, खासदार, आमदार आणि नेत्यांनी त्यांच्या नावासमोर चौकीदार शब्द जोडण्यास सुरुवात केली. तोच धागा पकडत राजनाथ यांनी पंतप्रधान मोदींसाठी जोरदार बॅटिंग केली आहे. 

Web Title: Chowkidar chor nahi pure hai says Rajnath Singh in vijay sankalap rally