पीएमपीएमएल संचालक मंडळाची महापालिकेतील पहिलीच बैठक तहकुब

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2019 05:10 PM2019-07-04T17:10:36+5:302019-07-04T17:16:22+5:30

पीएमपीएमएल प्रशासनाकडे कोणतीही ठोस माहिती नसल्याने ही बैठक येत्या गुरुवारपर्यंत तहकुब केली आहे.

The PMPML Board of Directors first meeting in corporation stay | पीएमपीएमएल संचालक मंडळाची महापालिकेतील पहिलीच बैठक तहकुब

पीएमपीएमएल संचालक मंडळाची महापालिकेतील पहिलीच बैठक तहकुब

Next
ठळक मुद्देपीएमपीची बैठक ही महापालिकेत व्हावी, अशी अनेक वर्षांपासूनची मागणी या बैठकीत पीएमपीला भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर चर्चा

पिंपरी :  पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल) संचालक मंडळाची पहिली बैठक पिंपरी-चिंचवड महापालिका मुख्यालयात आज झाली. मात्र, पीएमपीएमएल प्रशासनाकडे कोणतीही ठोस माहिती नसल्याने ही बैठक येत्या गुरुवारी सकाळी साडे दहावाजेपर्यंत तहकुब केली आहे. केवळ चर्चेचे गुऱ्हाळ करण्यात आले. 
महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात बैठक झाली. पीएमपीची बैठक ही महापालिकेत व्हावी, अशी अनेक वर्षांपासूनची मागणी होती. यावेळी पीएमपी संचालक मंडळाच्या या बैठकीला संचालक महापौर राहुल जाधव, स्थायी अध्यक्ष विलास मडिगेरी, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, स्थायी अध्यक्ष  सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, पीएमपी अध्यक्षा नयना गुंडे, आयुक्त तथा संचालक श्रावण हर्डीकर आदी उपस्थित होते.
या बैठकीत पीएमपीला भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. टाटा मोटर्सकडून खरेदी केल्या जाणाऱ्या दोनशे बसपैकी केवळ सहा बस तयार करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ऑगस्ट अखेर पीएमपीच्या ताफ्यात या बस दाखल होण्याची शक्यता नसल्याने गुरुवारी होणाऱ्या बैठकीत टाटा मोटर्सच्या अधिकाऱ्यांनादेखील याबाबतचे स्पष्टीकरण देण्यासाठी बोलविले जाणार आहे.
या महिन्याच्या अखेरपर्यंत पिंपरी-चिंचवड दर्शन बससेवा सुरु करण्याचे नियोजन केले असून, शहरातील पर्यटनस्थळांबरोबरच वारकरी सांप्रदायाच्या देहू-आळंदी या दोन्ही तीर्थक्षेत्रांचा समावेश करण्यावर चर्चा करण्यात आली. याशिवाय सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची देणी देण्यासाठी आवश्यक असलेला साडे चार कोटींचा निधी पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकांनी हिश्यानुसार देण्याचा विचार करावा. मात्र, त्यासाठी पीएमपी प्रशासनाने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या अपिलावर मध्यम मार्ग कसा काढता येईल, यासाठी प्रयत्न करावेत, असे संचालक मंडळांनी सुचविले. याशिवाय तत्कालीन व्यवस्थापकीय अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी पीएमपीमधील २९ कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले आहे. या सर्व कर्मचाऱ्यांची सुनावणी गुरुवारी होणाऱ्या बैठकीत घेतली जाणार आहे.

Web Title: The PMPML Board of Directors first meeting in corporation stay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.