हुंडा म्हणून बीअर बार द्या, पतीकडूनच विवाहितेचा छळ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2018 01:21 AM2018-09-01T01:21:30+5:302018-09-01T01:23:14+5:30

 Marriage Behind the Beer Bar | हुंडा म्हणून बीअर बार द्या, पतीकडूनच विवाहितेचा छळ

हुंडा म्हणून बीअर बार द्या, पतीकडूनच विवाहितेचा छळ

googlenewsNext

पिंपरी : माहेरहून हुंडा म्हणून बीअर बार किंवा आईच्या संपत्तीमधील अर्धा हिस्सा आणण्यासाठी सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ केला. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती पवनकुमार घनवट, सासू संध्या घनवट, सासरा गोपाळ घनवट (सर्व रा. इंद्रेश्वरनगर, एरिगेशन कॉलनी, इंदापूर) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी जयहिंद कॉलनी, रहाटणी फाटा, थेरगाव येथे राहणाऱ्या २१ वर्षीय विवाहितेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विवाहिता सासरी नांदत असताना पती, सासू आणि सासरे यांनी माहेराहून हुंडा आणण्याची वेळोवेळी मागणी केली. हुंडा म्हणून सासरच्या मंडळींनी पैसे न मागता विवाहितेच्या आईच्या संपत्तीमधील अर्धा हिस्सा आणावा किंवा बीअर बार सासरच्या मंडळींच्या नावावर करून घ्यावा, अशी मागणी केली. त्यावरून सासरच्या मंडळींनी विवाहितेला शिवीगाळ व मारहाण करीत उपाशी ठेवून अपरात्री घराबाहेर काढले. विवाहितेच्या आईलाही धमक्या देत शारीरिक व मानसिक त्रास दिला. तसेच विवाहितेच्या मुलाला आरोपींनी स्वत:कडे ठेवून घेतले, यावरून वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस तपास करीत आहेत.

मोबाइल हिसकावणारे जेरबंद
भोसरी : पादचाºयाच्या हातातील मोबाइल हिसकाविणाºया दोघांना एमआयडीसी भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना बुधवारी दुपारी चारच्या सुमारास भोसरी, एमआयडीसीतील अनुकूल कंपनीसमोरील रस्त्यावर घडली. शुभम नितीन काळभोर (वय-१८), अमर राम पोटभरे (वय-२०, दोघे रा. भीमशक्तीनगर, मोरेवस्ती, स्पाईनरोड, चिखली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी शरद शांताराम खवणेकर (वय-२४, रा. हनुमानवाडी, आळंदी-चाकण रोड, आळंदी) यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
४पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शरद हे भोसरी एमआयडीसीमधील अनुकूल कंपनीसमोरुन मोबाइलमध्ये आलेले मेसेज वाचत पायी जात होते. त्या वेळी दुचाकीवरुन आलेल्या शुभम आणि अमर यांनी शरद यांचा मोबाईल हिसकावून नेला. यावरुन शरद यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी आरोपींचा तपास घेत दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

सव्वादोन लाखांची फसवणूक
पिंपरी : कर्ज प्रकरण मंजूर करुन देण्याच्या नावाखाली सव्वादोन लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अब्दुल सय्यद (रा. दापोडी, पुणे) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी रेवराज देवनाथ तिघरे (वय ४२, रा. गंगोत्री पार्क, दिघी रोड, भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सय्यद याने तिघरे यांना पाच कोटींचे कर्जप्रकरण मंजूर करून देतो असे सांगितले. त्यापोटी प्रोसेसिंग फी व वकिलांची फी असे दोन लाख वीस हजार घेतले. मात्र, कर्ज प्रकरण मंजूर करून न देता तिघरे यांची फसवणूक केली. भोसरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title:  Marriage Behind the Beer Bar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.