"गुणरत्न सदावर्तेंना वेळीच आळा घालून गुन्हा नोंदवा" मराठा क्रांती मोर्चाची मागणी

By नारायण बडगुजर | Published: October 16, 2023 05:25 PM2023-10-16T17:25:20+5:302023-10-16T17:25:58+5:30

सतीश काळे यांचा पोलिसांकडे तक्रार अर्ज...

Maratha Kranti Morcha Demands "Stop the gunratn Sadavarts in time, register a case due to baseless statements" | "गुणरत्न सदावर्तेंना वेळीच आळा घालून गुन्हा नोंदवा" मराठा क्रांती मोर्चाची मागणी

"गुणरत्न सदावर्तेंना वेळीच आळा घालून गुन्हा नोंदवा" मराठा क्रांती मोर्चाची मागणी

पिंपरी : समाजात तेढ निर्माण करणारी बेताल वक्तव्ये करणाऱ्या गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते सतीश काळे यांनी केली. वाकड पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार अर्ज दिला आहे.

गुणरत्ने सदावर्ते हे मराठा समाजाच्या भावना दुखाविणारी वक्तव्ये करत आहेत. त्यांना वेळीच आळा घाला, अन्यथा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. बेताल वक्तव्यामुळे तसेच बेकायदेशीर आंदोलन केल्याप्रकरणी सदावर्ते यांची वकिलीची सनद दोन वर्षासाठी रद्द केलेली आहे. त्यांना छुपा पाठिंबा असणाऱ्या राजकीय नेत्यांची मर्जी सांभाळण्यासाठी बेताल वक्तव्य सदावर्ते करत आहेत. नुकतीच अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरातून मराठा बांधव स्वेच्छेने सभेसाठी जमले होते. ते स्वाभिमानाची लढाई लढत आहेत. ही लढाई उत्स्फूर्तपणे लढली जात आहे. या आंदोलनाला बदनाम करण्याचे प्रकार गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून केले जात आहे. मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली झालेली सभा ही जत्रा असल्याचे बेताल वक्तव्य सदावर्ते यांनी केले. त्यांच्या या वक्तव्याला काडीची किंमत नसली तरी अशा प्रवृत्तीला वेळीच रोखणे गरजेचे आहे.

मराठा आणि इतर समाजात तेढ निर्माण होईल, असे वातावरण सदावर्ते निर्माण करत आहेत. मराठा समाज बांधव हा सुज्ञ आहे. तो या षडयंत्राला बळी पडणार नाही. तसेच इतरही समाजातील बांधव सदावर्तेंच्या वक्तव्याचा गैर अर्थ काढणार नाहीत. मात्र सदावर्तेंसारख्या चुकीच्या माणसांना रोखण्यासाठी आणि सर्व समाजात एकोपा राहण्यासाठी सदावर्ते यांच्यावर मराठा समाजाची बदनामी केल्याप्रकरणी तसेच दोन समाजात तेढ निर्माण केल्याप्रकरणी त्वरित गुन्हा दाखल करणे गरजेचे आहे. त्यांची वक्तव्ये थांबली नाहीत, तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तसेच सदावर्तेंना मराठा समाज बांधवांच्या रोषाला त्यांना सामोरे जावे लागेल याची नोंद घ्यावी, असे काळे यांनी दिलेल्या तक्रार अर्जात नमूद केले आहे.

Web Title: Maratha Kranti Morcha Demands "Stop the gunratn Sadavarts in time, register a case due to baseless statements"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.