महाराष्ट्रातील पहिल्या हायब्रीड अॅन्युटी रस्ता प्रकल्पाचे लोणावळ्यात भूमिपुजन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2018 12:17 PM2018-09-12T12:17:21+5:302018-09-12T12:19:45+5:30

लोणावळा ते पवनानगर या महाराष्ट्रातील पहिल्या हायब्रीड अॅन्युटी प्रकल्पाच्या १४१ कोटी रुपयांच्या विकासकामाचे भूमिपुजन महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आले.

Maharashtra's first hybrid Annuity road project Bhumi Pujan in Lonavla | महाराष्ट्रातील पहिल्या हायब्रीड अॅन्युटी रस्ता प्रकल्पाचे लोणावळ्यात भूमिपुजन

महाराष्ट्रातील पहिल्या हायब्रीड अॅन्युटी रस्ता प्रकल्पाचे लोणावळ्यात भूमिपुजन

Next

लोणावळा : लोणावळा ते पवनानगर या महाराष्ट्रातील पहिल्या हायब्रीड अॅन्युटी प्रकल्पाच्या १४१ कोटी रुपयांच्या विकासकामाचे भूमिपुजन महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, खासदार श्रीरंग बारणे, आमदार संजय भेगडे , आदी मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्रातील पर्यटन विकासाला चालना देण्याकरिता पर्यटनस्थळांवर उभारण्यात येणार्‍या पहिल्या जनसुविधा केंद्राचा शुभारंभदेखील लोणावळा शहरातील रायवुड पार्क याठिकाणी करण्यात आला.

लोणावळा पवनानगर या रस्त्याची ओळकाईवाडी ते औंढे औंढोली दरम्यान मोठी दुरवस्था झालेली असल्याने नागरिकांना गैरसोयीचा मोठा सामना करावा लागत होता. हा रस्ता झाल्याने नागरिकांची मोठी समस्या सुटणार आहे. सोबतच पवनानगर भागातील पर्यटन विकासाला मोठी चालना मिळणार आहे.

Web Title: Maharashtra's first hybrid Annuity road project Bhumi Pujan in Lonavla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.