माणुसकीच्या नात्याने तो मदतीला धावला...परतफेडीत ‘Thank you’ ऐवजी त्याला मिळाला चाकू हल्ला... 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2019 04:04 PM2019-03-05T16:04:32+5:302019-03-05T16:09:52+5:30

एखाद्याला आपण काही मदत केली तर साहजिकच अपेक्षा नाही पण समोरच्याकडून येणारे धन्यवाद किंवा थँक यू मनाला खूप समाधान देऊन जाते. पण या आभाराऐवजी जर तुम्हाला शिवीगाळ आणि चाकूहल्ला मिळाला तर.. अशीच एक घटना घडली थेरगाव येथे..

He ran for help as humanity ... he gets a knife attack replacement of 'Thank you' | माणुसकीच्या नात्याने तो मदतीला धावला...परतफेडीत ‘Thank you’ ऐवजी त्याला मिळाला चाकू हल्ला... 

माणुसकीच्या नात्याने तो मदतीला धावला...परतफेडीत ‘Thank you’ ऐवजी त्याला मिळाला चाकू हल्ला... 

Next

पिंपरी : दुचाकीस्वाराची रस्त्यावर पडलेली टोपी त्याच्या पाठोपाठ असलेल्या दुसऱ्या दुचाकीस्वाराने मदतीच्या भावनेने उचलून दिली. मात्र, टोपी देत असताना मदत करणारयावरच चाकूहल्ला करण्यात आला. याप्रकारे उपकाराची परतफेड चाकूहल्लयाने झाल्याची घटना थेरगाव येथे रविवारी  सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. 
    महेश सुधाकर पवार (वय २५, रा. रामोशी वाडा, सेनापती बापट रोड, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रविवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास थेरगाव येथील गव्हाणे हॉस्पिटलसमोरील सार्वजनिक रस्त्यावरुन महेश पवार व त्यांचे मित्र दिनेश दिपक सुर्वे (वय २७) हे दुचाकीवरुन जात होते. त्यावेळी समोरुन जात असलेल्या दुचाकीस्वार आरोपीची टोपी रस्त्यावर पडली. रस्त्यावर पडलेली टोपी महेश पवार यांनी हे आरोपीला दिली देत असता त्याचवेळी आरोपींनी काहीही कारण नसताना महेश पवार यांना शिवीगाळ करीत त्यांच्यावर चाकूहल्ला केला. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: He ran for help as humanity ... he gets a knife attack replacement of 'Thank you'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.