पुण्यात चाकूचा धाक दाखवत सोन्याची बिस्किटे लुटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 05:50 AM2018-03-30T05:50:42+5:302018-03-30T05:50:42+5:30

मुंबईतील सराफा बाजारातून पुण्यातील सराफा व्यावसायिकासाठी आणलेल्या सव्वा कोटींची सोन्याची बिस्किटे चाकूचा

Gold biscuits robbed of knife in Pune | पुण्यात चाकूचा धाक दाखवत सोन्याची बिस्किटे लुटली

पुण्यात चाकूचा धाक दाखवत सोन्याची बिस्किटे लुटली

googlenewsNext

पिंपरी (पुणे) : मुंबईतील सराफा बाजारातून पुण्यातील सराफा व्यावसायिकासाठी आणलेल्या सव्वा कोटींची सोन्याची बिस्किटे चाकूचा धाक दाखवून लुटण्यात आली़ बालेवाडी स्टेडियमच्या प्रवेशद्वारासमोर बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास हा थरार घडला. ही बिस्किटे तब्बल ४ किलो ९०० ग्रॅम वजनाची होती़
फिर्यादी बेहराराम पुरोहितने मालक अरविंद सरेमल चोप्रा यांच्या सांगण्यावरून पुरोहित मुंबईतील जव्हेरी सराफी बाजारातून ही बिस्किटे घेऊन खासगी मोटारीने पुण्याकडे येत होता. त्यावेळी मोटारीतून उतरून टिंबर मार्केटकडे जाण्यासाठी तो एका रिक्षात बसला. या वेळी रिक्षात अन्य दोघे बसले होते. त्या दोघांनी चाकूचा धाक दाखवून पुरोहितला लुटले़

Web Title: Gold biscuits robbed of knife in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.