शासकीय कामात अडथळा  आणल्याप्रकरणी  तळेगाव दाभाडेतील भाजप नगरसेवकांवर गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2018 07:29 PM2018-11-03T19:29:15+5:302018-11-03T19:33:47+5:30

येथील नगरपरिषदेतील सत्तारूढ भाजपचे नगरसेवक आणि अर्थ व  नियोजन समितीचे सभापती अमोल जगन्नाथ शेटे यांच्यावर शासकीय कामात अडथळा  आणल्याप्रकरणी येथील पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल झाला आहे.

due to obstructing government work FIR filed against BJP Corporator | शासकीय कामात अडथळा  आणल्याप्रकरणी  तळेगाव दाभाडेतील भाजप नगरसेवकांवर गुन्हा दाखल 

शासकीय कामात अडथळा  आणल्याप्रकरणी  तळेगाव दाभाडेतील भाजप नगरसेवकांवर गुन्हा दाखल 

Next

तळेगाव दाभाडे : येथील नगरपरिषदेतील सत्तारूढ भाजपचे नगरसेवक आणि अर्थ व  नियोजन समितीचे सभापती अमोल जगन्नाथ  शेटे(वय ४०)यांच्यावर शासकीय कामात अडथळा  आणल्याप्रकरणी येथील पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल झाला आहे. नगर परिषदेचे सहाय्यक अग्निशमन स्थानक पर्यवेक्षक पद्मनाभ सुधीर कुल्लरवार(वय ३४)यांनी शेटे यांच्या विरोधात येथील पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

            फिर्यादीत म्हटले आहे की,बुधवारी (३१ऑक्टोबर) दुपारी १२.३० च्या सुमारास  नगराध्यक्षांच्या केबिनमध्ये तीन  ते चार नगरसेवकांसमक्ष अमोल शेटे यांनी कारण नसताना दमदाटी करून अपमानीत केले.शेटे हे मानसिक त्रास देतात.विशेष म्हणजे फिर्यादीत अमोल शेटे यांचे पूर्ण नाव माहीत नसल्याचे म्हटले आहे.अमोल शेटे यांच्यावर कलम ३५३,५०४,५०६  अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वस्तुस्थिती काय आहे, याची खात्री केल्यानंतरच  अमोल शेटे यांच्यावर योग्य ती  कारवाई केली जाईल अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक भानुदास जाधव यांनी दिली.

         पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कमलाकर भोसले करीत आहे. यासंदर्भात अमोल शेटे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, लोकप्रतिनिधींनी कामाचा पाठपुरावा करणे म्हणजे शासकीय कामात अडथळा केला असे होत नाही.नगरपरिषदेचा अग्निशामक बंब  ३०जुलै रोजी चाकण येथे  समाज कंटकांनी केलेल्या दंगली आणि  जाळपोळीत अर्थवट जळाला असून त्याचा सध्या काहीच उपयोग होत  नाही.सर्व सामान्य नागरिकांच्या जीवनाशी निगडीत हा प्रश्न आहे. यावर नगराध्यक्षांच्या  केबिनमध्ये चर्चा चालू होती. येथे होणारे 'जाणता राजा' हे महानाट्य आणि दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन परिस्थिती उदभवल्यास अग्निशमन  बंबाची पर्यायी व्यवस्थेबाबत तसेच जळालेल्या बंबाची इन्शुरन्स बाबत अद्ययावत माहिती घेण्यासाठी नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांनी पद्मनाभ कुल्लरवार यांना स्वतःच्या  केबिनमध्ये बोलावले.

               यावेळी उपनगराध्यक्ष संग्राम काकडे,आरोग्य समितीचे सभापती अरुण भेगडे पाटील,नगरसेवक संतोष शिंदे,मुकेश अगरवाल आणि मी स्वतः उपस्थित होतो. पद्मनाभ यांच्याकडे अग्निशमन बंबाच्या इन्शुरन्स कागदपत्रांची मागणी केली असता ,काय नाटक लावले आहे तुम्ही,तुम्ही काय थेरं करताय,काम तर काहीच करीत नाही असे उद्धट बोलून कुल्लरवार यांनी  लोकप्रतिनिधींना अपशब्द वापरले. लोकांच्या निगडीत असलेला हा महत्त्वाचा प्रश्न वेळेत मार्गी लागणे गरजेचे असताना पद्मनाभ हे कामात हलगर्जीपणा करतात. मुख्याधिकारी वैभव आवारे यांच्याकडेही कुल्लरवार यांच्या विषयी गंभीर तक्रारी आल्या आहेत.

Web Title: due to obstructing government work FIR filed against BJP Corporator

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.