पिंपरी येथे डंपरच्या धडकेने दुचाकीस्वार ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 16:50 IST2018-03-23T16:50:57+5:302018-03-23T16:50:57+5:30
भरधाव वेगात आलेल्या कचयाच्या डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिली.

पिंपरी येथे डंपरच्या धडकेने दुचाकीस्वार ठार
पिंपरी : डंपर दुचाकीच्या धडकेत १८ वर्षीय दुचाकीस्वार तरुण ठार झाला. हा अपघात शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास आकुर्डी, खंडोबा माळ चौकाजवळ घडला. अनिकेत आण्णासाहेब जकाते (वय १८, रा. चिंचवड), असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिकेत जकाते सकाळी दूध टाकण्यासाठी दुचाकीवरून जात होता. खंडोबा माळ चौकाजवळ भरधाव वेगात आलेल्या कचऱ्याच्या डंपरने (वाहन क्रमांक एमएच ०२, एवाय ९१०९) अनिकेतच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये अनिकेत गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी वायसीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याबाबत निगडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.