Pimpri-Chinchwad Crime: 'आम्ही इथले भाई आहोत, आम्हाला हप्ता द्यायचा' म्हणत फोडले दुकान

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2021 04:00 PM2021-12-11T16:00:00+5:302021-12-11T16:00:03+5:30

मेरे बच्चे लोगो का फ्री मे बाल काटने का, नही तो तेरा दुकान तोड दुंगा, असेही आरोपी म्हणाला

dapodi crime news store looted threaten salon owner | Pimpri-Chinchwad Crime: 'आम्ही इथले भाई आहोत, आम्हाला हप्ता द्यायचा' म्हणत फोडले दुकान

Pimpri-Chinchwad Crime: 'आम्ही इथले भाई आहोत, आम्हाला हप्ता द्यायचा' म्हणत फोडले दुकान

googlenewsNext

पिंपरी : आम्ही दापोडीचे भाई आहोत, आमच्यावर पोलीस स्टेशनला भरपूर गुन्हे दाखल आहेत, इथून पुढे आम्हाला हप्ता द्यायचा, अशी धमकी दिली. दुकानाच्या दरवाजावर लाकडी दांडक्याने मारून नुकसान केले. तसेच कोयता उलट्या बाजूने मारून दुकानदाराला दुखापत केली. याप्रकरणी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दापोडी येथे शुक्रवारी (दि. १०) सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली.

समसाद रफिक शाह (वय २२, रा. दापोडी, मूळ रा. उत्तर प्रदेश) यांनी याप्रकरणी शनिवारी (दि. ११) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. ओमकार गायकवाड, राम कांबळे, सैफाली रैन (तिघेही रा ‌ दापोडी) आणि एक अनोळखी इसम यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे दापोडी येथे न्यू स्टेटस सलून नावाचे केस कापण्याचे दुकान आहे. आरोपी हे फिर्यादीच्या दुकानात आले. आरोपी ओंकार गायकवाड यांनी त्याच्या हातातील लोखंडी कोयता उलट्या बाजूने फिर्यादीच्या डोक्यात मारून फिर्यादीला दुखापत केली. मेरे बच्चे लोगो का फ्री मे बाल काटने का, नही तो तेरा दुकान तोड दुंगा, असे आरोपी म्हणाला. त्यानंतर आरोपींनी लाकडी दांडक्याने फिर्यादीच्या दुकानातील काच फोडून दुकानाच्या गल्यातील एक हजार २०० रुपये जबरदस्तीने काढून घेतले.

आम्ही दापोडीचे भाई आहोत, आमच्या पोलीस स्टेशनला भरपूर गुन्हे दाखल आहेत. तू इथून पुढे आम्हाला हप्ता द्यायचा, अशी धमकी आरोपींनी दिली. दुकानाच्या बाहेर येऊन आरोपींनी दहशत पसरविण्यासाठी आरडाओरडा केला. लाकडी दांडक्यांनी दुकानाच्या दरवाजावर मारून दुकानाचे नुकसान केले, असे फिर्यादीत नमूद आहे.

Web Title: dapodi crime news store looted threaten salon owner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.