मुंबई- बंगळूर महामार्गावर मोटार जळून खाक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2018 12:57 PM2018-11-21T12:57:22+5:302018-11-21T13:00:40+5:30

पुण्याहून मुंबईच्या दिशेने जात असलेल्या मोटारीने अचानक पेट घेतल्याने जळून खाक झाली...

car burned On the Mumbai-Bangalore highway | मुंबई- बंगळूर महामार्गावर मोटार जळून खाक

मुंबई- बंगळूर महामार्गावर मोटार जळून खाक

Next

हिंजवडी : मुंबई - बंगळूर महामार्गावर चालत्या मोटारीने अचानक पेट घेतल्याने जळून खाक झाली. ही घटना आज पहाटे तीनच्या सुमारास महामार्गावर सुस पाषाण पुलाजवळ घडली.किरण लक्ष्मण जांभळे (वय २५, रा. महादेवनगर दिघी) असे वाहनचालकाचे नाव असून ते पुण्याहून मुंबईच्या दिशेने जात होते. चालू गाडीत अचानक फटाका फुटल्यासारखा आवाज झाला व धुर येऊ लागल्याचे लक्षात येताच चालकाने वेळीच गाडी बाजूला घेतल्याने मोठा अनर्थ टळला.मात्र, या आगीत इंडिका मोटार (एमएच. २४. एयु. ०८२०) पूर्णपणे जळून खाक झाली आहे. हिंजवडी पोलीस पुढील घटनेचा तपास करत आहे. 

Web Title: car burned On the Mumbai-Bangalore highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.