चुकांमुळे ८,८६७ आधार दुरुस्ती प्रलंबित

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2018 02:14 AM2018-12-05T02:14:58+5:302018-12-05T02:15:08+5:30

पिंपरी-चिंचवड शहरातील टपाल कार्यालयांत आधार केंद्र उपलब्ध करुन दिले आहे.

8867 ground repair due to mistakes | चुकांमुळे ८,८६७ आधार दुरुस्ती प्रलंबित

चुकांमुळे ८,८६७ आधार दुरुस्ती प्रलंबित

googlenewsNext

- मंगेश पांडे 
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील टपाल कार्यालयांत आधार केंद्र उपलब्ध करुन दिले आहे. या केंद्रांवर मागील आठ महिन्यांत नवीन आधार कार्ड अवघी ९१८ निघाली असून, यापूर्वी काढलेल्या कार्डांमध्ये दुरुस्ती करवून घेणाऱ्यांचीच संख्या तब्बल ८ हजार ८६७ इतकी आहे. त्यामुळे नवीन आधार कार्डांऐवजी चुकांमुळे ‘निराधार’ झालेल्या कार्डदुरुस्तीचीच संख्या अधिक वाढल्याचे दिसून येते.
सध्या प्रत्येकाकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. शासनाद्वारे नागरिकाला बारा अंकी ओळख क्रमांक आहे. बँक खाते उघडण्यासह पासपोर्ट, मतदार ओळखपत्र, तसेच वाहन परवाना असो, की पॅनकार्ड; आधार कार्डची आवश्यकता भासत आहे. यासाठी शासनामार्फत आधार केंद्र सुरु असून, या ठिकाणी ठरावीक कागदपत्रे सादर केल्यानंतर कार्ड उपलब्ध होत आहे.
दरम्यान, टपाल कार्यालयातही आधार कार्डची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील २२ केंद्रांवर टपाल कार्यालयामार्फत ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या केंद्रांवर मार्च महिन्यापासून १५ नोव्हेंबर या आठ महिन्यांत पिंपरी-चिंचवड शहरातील ९१८ जणांनी नवीन आधार कार्ड काढले आहे, तर ८ हजार ८६७ जणांनी दुरुस्ती करवून घेतली आहे. त्यामुळे नवीन कार्ड काढणाºयांपेक्षा कार्डमध्ये दुरुस्ती करवून घेणाºयांचे प्रमाण आठपट अधिक असल्याचे दिसून येते. नवीन आधारकार्ड काढण्याचे प्रमाण कमी झाले आहे.
>जन्मतारीख दुरुस्तीचे प्रमाण अधिक
आधार कार्डची मोहीम सुरूझाली त्या वेळी सुरुवातीला कार्ड काढलेल्या नागरिकांच्या कार्डवर जन्मतारखेचे केवळ जन्मसाल टाकण्यात आले. तसेच पूर्ण नाव न टाकता सुरुवातीचे नाव, तसेच आडनाव नमूद करण्यात आले. यामुळे अशा कार्डधारकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
>नवीन आधारकार्ड काढण्याचे प्रमाण कमी
दरम्यान, पासपोर्ट, पॅनकार्ड, बॅँक अकाउंट आदी कामकाजासाठी आधारकार्ड आवश्यक असताना त्यावर पूर्ण जन्मतारीख, पूर्ण नाव, अचूक पत्ताही असणे गरजेचे आहे. मात्र, कार्डमध्ये त्रुटी असल्यास मोठी अडचण निर्माण होते. त्यामुळे त्रुटी असलेल्या आधार कार्डमध्ये पुन्हा दुरुस्ती करून घ्यावी लागत असल्याने नवीन कार्डऐवजी दुरुस्ती करणाºयांचेच प्रमाण अधिक असून, यामध्ये जन्मतारखेची दुरुस्ती करणाºयांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून येते.
>नवीन तसेच दुरुस्ती करवून घेणाºयांची केंद्रनिहाय संख्या
आधार केंद्र नवीन दुरुस्ती
कार्ड
आकुर्डी ०० २३९
औंध कॅम्प १६ २७९
भोसरी (आयई) १९ २३०
भोसरीगाव ५६ ४४४
चिंचवड स्टेशन ११० ६६७
चिंचवडगाव १ ९१
सीएमई १ २९
दापोडी १५ ११०
दिघी कॅम्प १४ ४३३
इन्फोटेक पार्क १८० १५५३
कासारवाडी ८० २५४
आधार केंद्र नवीन दुरुस्ती
कार्ड
खडकी २३ २८२
खडकीबाजार ० १३६
पीसीएनटी १५ १७१
पिंपळे गुरव ३ ३८६
पिंपरी कॉलनी १६६ ११२४
पिंपरी (पीएफ) ४८ १२१७
पुणे कॅन्टोन्मेंट ७७ ५३९
(इस्ट)
इंद्रायणीनगर ० ६३
दक्षिण खडकी ७ १९४
रुपीनगर १९ १२५

Web Title: 8867 ground repair due to mistakes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.