WhatsApp Scam 2022: 'सॉरी, तुम्ही कोण?' व्हॉट्सअ‍ॅपवरचा हा मेसेज करेल तुमचं बँक अकॉउंट रिकामं

By सिद्धेश जाधव | Published: January 4, 2022 06:35 PM2022-01-04T18:35:19+5:302022-01-04T18:43:10+5:30

WhatsApp Scam 2022: WhatsApp देशातील लोकप्रिय इन्स्टंट मेसिजिंग अ‍ॅप आहे. परंतु या अ‍ॅपची लोकप्रियताच कधी कधी धोकादायक ठरते. सध्या व्हॉट्सअ‍ॅपवर ‘’Sorry, who are you?’’ (सॉरी, तुम्ही कोण ?) असा एक मेसेज पाठवून फसवणूक केली जात आहे.

व्हॉट्सअ‍ॅपवर वर येणारा असा एक मेसेज तुमचं बँक अकॉउंट रिकामं करू शकतो. सायबर गुन्हेगारांनी युजर्सना फसवण्यासाठी एक नवीन पद्धत शोधून काढली आहे. रिपोर्टनुसार, व्हॉट्सअ‍ॅपवर अनोळखी नंबरवरून ‘’Sorry, who are you’’ असा मेसेज पाठवून लोकांना फसवले जाते, या स्कॅमची माहिती घेतल्यास तुम्ही वाचू शकता.

WABetaInfo नं या स्कॅमची माहिती दिली आहे. या फसवणुकीचा हॅकर्स व्हॉट्सअ‍ॅपवर बॅन असलेल्या VoIP नंबरचा वापर करतात आणि अनेकांना लक्ष्य करतात.

ठरलेल्या सावजाला एक मेसेज पाठवला जातो आणि विचारले जाते Sorry, who are you? I found you in my address book (माफ करा, तुम्ही कोण आहात? तुमचा नंबर माझ्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये होता.)

चॅटिंग करत तुमच्यकडून तुमचं नाव, काम, वय इत्यादी माहिती मिळवतात. तसेच तुमचा विश्वास मिळवण्यासाठी तुमचं कौतुक देखील करतात.

त्यानंतर हॅकर्स फेसबुक आणि इन्स्टाग्राम प्रोफाईलच्या माध्यमातून तुमची अजून माहिती गोळा करतात. त्यामुळे पैसे लंपास करणं सोपं होऊन जातं. ही पद्धत जुनी असली तरी यात अनेकजण अडकतात.

त्यांनतर तुम्हाला ब्लॅकमेल करण्यासाठी तुमचा एडिटेड फोटो किंवा इतर खाजगी फोटो दाखवला जातो. असा फोटो तुमच्या नातेवाईकांना पाठवण्याची धमकी दिली जाते आणि तुमच्याकडे पैसे देण्याची मागणी केली जाते. पैसे देऊनही ब्लॅकमेलिंग थांबत नाही.

अनोळखी लोकांच्या मेसेजेसकडे दुर्लक्ष करणं, कोणाशीही खाजगी माहिती शेयर न कारणं आणि तुमचा फोटो किंवा इतर माहिती फक्त तुमच्या ओळखीच्या लोकांना मिळेल अशी सेटिंग करणं, या गोष्टी केल्यास तुमचा गैरफायदा घेतला जाणार नाही.