अलर्ट! स्मार्टफोन वापरताना 'या' गोष्टी ठेवा लक्षात अन्यथा कॅन्सर, ब्रेन ट्यूमरसारखे होऊ शकतात आजार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2022 02:14 PM2022-07-23T14:14:57+5:302022-07-23T14:24:04+5:30

स्मार्टफोनचा वापर चांगल्या कामासाठी होत असला तरी त्याचा अतिरिक्त वापर करणे हे आरोग्याच्या दृष्टीने घातक असल्याचं समोर आलं आहे.

स्मार्टफोन हा हल्ली प्रत्येकाच्या जगण्याचा एक अविभाज्य भाग झाला आहे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वच जण स्मार्टफोनचा वापर हमखास करतात. काही जणांना स्मार्टफोन नसेल तर करमतच नाही.

स्मार्टफोन वापरत नाहीत असे फार कमी लोक आपल्याला दिसतील. अनेक जण तास न तास स्मार्टफोनचा वापर करीत आहेत. मात्र स्मार्टफोनचा वापर चांगल्या कामासाठी होत असला तरी त्याचा अतिरिक्त वापर करणे हे आरोग्याच्या दृष्टीने घातक असल्याचं समोर आलं आहे.

हल्ली लहान मुलांच्या हातात जास्त वेळ फोन असलेला पाहायला मिळतो. गेम खेळण्यासाठी स्मार्टफोनचा करतात. स्मार्टफोनमधून जीवघेणे रेडिएशन्स निघत असतात. ते डोळ्यासाठी चांगले नाहीत यासोबतच व्यक्तीच्या आरोग्यासाठी देखील अत्यंत धोकादायक ठरू शकतात.

डोळ्यांना सर्वाधिक त्रास होतो. पण आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे. स्मार्टफोनचा गरजेपेक्षा जास्त वापर केल्यास तुम्हाला कॅन्सर आणि ब्रेन ट्यूमर सारखा मोठा आजार होण्याची धोका आहे.

स्मार्टफोनचा वापर करीत असताना यातून एक प्रकारची रेडियो फ्रीक्वेन्सी (RF) रेडिएशन निघत असतात. याचा आपल्या शरीरावर, डोक्यावर खूप मोठा परिणाम होत असतो. फोनमधून निघणाऱ्या रेडिएशन्समुळे व्यक्तीला ब्रेन ट्यूमर होण्याची शक्यता 40 टक्क्यांनी वाढते.

स्मार्टफोनमध्ये अनेक दमदार फीचर्स आणि जबरदस्त सुविधा देण्यात आल्या आहेत. परंतु, फोनचा सर्वात जास्त वापर हा फक्त कॉलिंगसाठी केला जातो. अनेक जण फोनवर कित्येक तास बोलत असतात.

जर तुम्ही फोनचा जास्त वापर करीत असाल तर कॉलवरील रेडिएशन्स खूप वाढले जातात. त्यामुळे तुम्ही नेहमी फोनला दूर ठेवण्याचा प्रयत्न करा किंवा फोनवर शक्य तितके कमी बोलण्याचा प्रयत्न करा.

प्रत्येक 30 सेकंदात फोनमधून हीट रेडिएशन निघत असतात. ते शरीराच्या प्रमुख अवयवांना खराब करण्याचे काम करीत असतात. जर तुम्हाला खूप वेळ फोनवर बोलायचं असेल तर फोन स्पीकरवर ठेवा.

बस, ट्रेन, रिक्षा, टॅक्सीतून प्रवास करीत असताना गरजे असेल तेव्हाच फोनचा वापर करा. अशावेळी फोनमधून रेडिएशन जास्त बाहेर पडत असतात आणि ते शरीरासाठी हानिकारक ठरू शकतात.

गाडी पार्क केलेली असेल किंवा त्यात तुम्ही बसलेले असाल आणि तुम्ही तुमच्या फोनचा वापर करीत असाल तर हे सुद्धा धोकादायक आहे. जवळपासच्या गाड्यांमधून बाहेर पडणारी हिट आणि मोबाईल मधून बाहेर पडणारे रेडिएशनमुळे तुम्हाला नुकसान होऊ शकते.

आपल्यापैकी अनेकांना रात्री झोपताना फोन वापरण्याची एक वाईट सवय आहे. रात्री झोपताना स्मार्टफोनमधून बाहेर पडणारे रेडिएशन आणि अनेक इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड्स (EMF) स्लीप सायकलला खराब करण्याचे काम करतात.

अनेकांना घाबरायला होऊ शकते. तसेच अशक्तपण सुद्धा जाणवू शकतो. याचा इम्यून सिस्टमवर देखील परिणाम होतो. त्यामुळे झोपताना नेहमी स्मार्टफोनला दूर ठेवा. डोकेदुखी, चक्कर येणे, दम लागणे किंवा अशक्तपणा येत असेल तर याचे कारण फोनचा जास्त वापर करणे, हे असू शकते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.