मोठी ऑफर! फक्त 950 रुपयांत मिळणार Samsung Galaxy F13, आजच करा ऑर्डर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2022 06:05 PM2022-11-24T18:05:55+5:302022-11-24T18:09:49+5:30

जर तुम्ही स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. फ्लिपकार्टवर बंपर सेल सुरू झाला आहे.

जर तुम्ही स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. फ्लिपकार्टवर बंपर सेल सुरू झाला आहे. या सेलमध्ये तुम्हाला Samsung Galaxy F13 वरही मोठी सूट मिळत आहे.

एवढी मोठी सूट मिळवण्यासाठी तुम्हाला काही काही स्टेप अवलंबाव्या लागणार आहेत. SAMSUNG Galaxy F13 (Nightsky Green, 64GB) (4GB RAM) ची MRP रु. 14,999 आहे आणि तुम्ही 20% सवलतीनंतर रु.11,999 मध्ये खरेदी करू शकता. यासोबतच तुम्हाला यावर अनेक बँक ऑफर्सही मिळत आहेत.

तुम्ही फेडरल बँक क्रेडिट/डेबिट कार्डवरून पेमेंटवर 10% सूट देखील मिळवू शकता. पंजाब नॅशनल बँक क्रेडिट कार्डवरून पेमेंट केल्यावर तुम्हाला स्वतंत्रपणे 10% सूट मिळणार आहे.

तुम्ही एक्सचेंज ऑफर अंतर्गत Galaxy F13 देखील खरेदी करू शकता. तुम्हाला फक्त जुना स्मार्टफोन फ्लिपकार्टला एक्सचेंज करायचा आहे. त्याऐवजी तुम्हाला 11,050 रुपयांची सूट मिळू शकते. तसेच कंपनीकडून 1 वर्षाची वॉरंटी दिली जात आहे. आज ऑर्डर केल्यावर हा फोन शनिवारपर्यंत डिलिव्हर केला जाईल.

हा फोन स्पेसिफिकेशनच्या बाबतीतही खूप चांगला आहे. फोनमध्ये तुम्हाला 4GB रॅम आणि 64GB स्टोरेजचा पर्याय देण्यात आला आहे.

Samsung Galaxy F13 मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा उपलब्ध आहे. कॅमेरा 50MP चा आहे. तर फोनमध्ये 8MP फ्रंट कॅमेरा देखील आहे. F13 मध्ये 6000 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

फोनच्या बॅटरी बॅकअपबाबत तुम्हाला कोणतीही तक्रार असणार नाही. यामध्ये Exynos 850 प्रोसेसर देण्यात आला आहे. त्यामुळे फोनच्या स्पीडबाबत कोणतीही तक्रार नसेल.