एक, दोन नव्हे, तर चक्क चार कॅमेऱ्यांचा फोन; सॅमसंगचा Galaxy A9 भारतात लाँच

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2018 06:50 PM2018-11-20T18:50:51+5:302018-11-20T18:59:37+5:30

तीन कॅमेरे असलेला स्मार्टफोन गॅलक्सी ए 7 2018 हा लाँच केल्यानंतर सॅमसंगनं 20 नोव्हेंबर रोजी भारतात गॅलक्सी ए9 2018 हा मोबाइल ग्राहकांना उपलब्ध करून दिला आहे.

दुपारी 12 वाजता गुरुग्रामधल्या एका कार्यक्रमात या मोबाइल फोनचं अनावरण करण्यात आलं.

सॅमसंग गॅलक्सी ए9 2018मध्ये 4 रिअर कॅमेरे दिले असून, एक फ्रंट कॅमेराही आहे. तसेच या फोनला 6.3 इंचाचा इनफिनिटी डीस्प्ले देण्यात आला आहे.

सॅमसंग गॅलक्सी ए9 2018 या मोबाइल फोनचं गेल्या महिन्यात मलेशियातील क्वालालंपूरमध्ये लाँचिंग झालं होतं.

या मोबाइल फोनमध्ये अँड्रॉइड 8.1 ओरिया वर्जन दिलं आहे. ज्याचं रिझॉल्युशन 1080x2280 पिक्सल आहे.

या मोबाइलमध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 660 प्रोसेसर, 8 जीबी रॅम आणि 128 जीबीचं स्टोअरेज दिलं असून, 512 जीबीपर्यंत मेमरी वाढवता येते.

सॅमसंग गॅलक्सी ए 9 2018मध्ये 4 रिअर कॅमेरे बसवण्यात आले असून, ज्यात 24 मेगापिक्सलच्या f/1.7 अपर्चरचा मुख्य कॅमेरा दिला आहे.

Galaxy A9 (2018)मध्ये 3800 एमएएच बॅटरी देण्यात आली असून, फास्ट चार्जिंगला ते सपोर्ट करते. त्याच बरोबर कनेक्टिव्हिटीसाठी 4जी व्हीओएलटीई, ब्लूटूथ v5.0, यूएसबी टाइप-सी, एनएफसी और 3.5 एमएमचा हेडफोन देण्यात आला आहे.

फोनच्या पावर बटनमध्ये तुम्हाला फिंगरप्रिंट सेन्सरही देण्यात आला आहे. हा फोन बब्बलगम पिंक, कॅव्हियर ब्लॅक आणि लेमोनेड ब्लू कलर व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे.

दुसरी लेन्स 10 मेगापिक्सलची असून, टेलिफोटोच्या माध्यमातून ज्यात 2Xपर्यंत कॅमेरा झुम करता येतो. तिसरी लेन्स 8 मेगापिक्सलची असून, अल्ट्रा वाइड अँगलही दिला आहे.

चौथी लेन्स 5 मेगापिक्सलची आहे. चारही कॅमेरे एका रेषेत खाली-वर आहेत.

सॅमसंग गॅलक्सी ए9 2018ची किंमत 39,000 रुपये इतकी असल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय. परंतु तुम्हाला सॅमसंगच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊनच या मोबाइलची खरी किंमत समजू शकेल.

टॅग्स :सॅमसंगsamsung