Samsung कडून न्यू ईयरचं गिफ्ट; TV विकत घेतल्यास साउंडबार आणि टॅबलेट मोफत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2022 06:17 PM2022-01-05T18:17:00+5:302022-01-05T18:30:08+5:30

Samsung Big TV Days Sale: Samsung नं भारतात Big TV Days Sale ची सुरुवात केली आहे. हा सेल 1 ते 31 जानेवारी 2022 दरम्यान सुरु राहील. या सेल अंतर्गत सॅमसंगच्या 55-इंच आणि त्यापेक्षा मोठ्या स्क्रीन असलेल्या QLED आणि UHD टीव्ही मॉडेल्सवर डिस्काउंटसह अनेक ऑफर दिल्या जात आहेत. या ऑफर्सचा लाभ ऑफलाईन स्टोर्सवरून देखील घेता येईल.

सॅमसंग बिग टीव्ही डेज सेलमध्ये 55-इंचापेक्षा मोठ्या नियो QLED 8K TVs, QLED TV आणि UHD TV या मॉडेल्सवर निश्चित ऑफर आणि विशेष डील दिली जात आहे.

काही मॉडेल्स सोबत कंपनीनं साऊंडबार मोफत देत आहे. तर काही टीव्ही मॉडेल्ससह सॅमसंग टॅब मिळत आहे. चला जाणून घेऊया या सेलमधील ऑफर्स.

सॅमसंग बिग टीव्ही डेज सेलमध्ये 85-इंच आणि 75-इंचाच्या नियो QLED 8K TV च्या खरेदीवर 94,990 रुपयांचा साउंडबार मोफत मिळेल.

65-इंच नियो QLED 8K TV, 75-इंच UHD TV, 65-इंच आणि 55-इंच नियो QLED TV, 65-इंच आणि 55-इंचाच्या QLED TV विकत घेतल्यास गॅलेक्सी A7 LTE टॅब मोफत मिळेल. या टॅबची किंमत 21,999 रुपये आहे.

या सेलमध्ये 20% पर्यंत कॅशबॅक आणि एक्सटेंडेड वॉरंटी देखील मिळेल. तसेच फक्त 1,990 रुपयांच्या ईएमआयवर सॅमसंगचे 55-इंचापेक्षा मोठे टीव्ही विकत घेता येतील.

ऑफर अंतर्गत सॅमसंग QLED TV 10 वर्षांच्या अतिरिक्त नो-स्क्रीन बर्न-इन वॉरंटीसह विकत घेता येतील. इतर सॅमसंग TV मॉडेलवर एक वर्षांची स्टँडर्ड आणि वर्षाची अतिरिक्त वॉरंटी देखील मिळेल.