तुमचा WhatsApp DP कोणीतरी गुपचूप पाहतंय? ‘असे’ करा चेक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2021 06:45 PM2021-05-20T18:45:09+5:302021-05-20T18:50:29+5:30

आता तुमचा WhatsApp Profile Photo नेमकं कोण कोण पाहतोय हे कसे पाहावे? जाणून घ्या...

आताच्या घडीला WhatsApp हे सर्वांत आघाडीचे चॅटअॅप आहे. अनेकविध सोयी-सुविधा अॅप युझर्सना देत आहेत.

अनेकांच्या आयुष्यात स्मार्टफोन त्यात WhatsApp महत्त्वाचा भाग झाला आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर केवळ चॅटच नाही, तर व्हिडीओ कॉल, ऑडिओ कॉल, शेअरिंगच्या अनेक सुविधाही मिळतात.

जवळपास प्रत्येक स्मार्टफोन युजर व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करतो. व्हॉट्सअ‍ॅपवर आपला प्रोफाईल फोटो (DP) ठेवला जातो. पण, तुमचा फोटो कोणी-कोणी पाहिले ते तपासता येत नाही.

अशी एक ट्रिक आहे, ज्याद्वारे तुमचा WhatsApp DP कोण पाहतेय, हे जाणून घेता येऊ शकते. यासाठी सोपी प्रक्रिया आपण फॉलो केली की, याची माहिती आपण घेऊ शकता.

तुमचा व्हॉट्सअ‍ॅप प्रोफाईल फोटो कोण पाहतंय, हे पाहण्यासाठी आपल्याला एक अ‍ॅप डाउनलोड करावे लागेल. सर्वप्रथम गुगल प्ले स्टोरवर तुमच्या अँड्रॉईड स्मार्टफोनमध्ये WhatsApp Who Viewed Me या WhatsApp Tracker नावाचे अ‍ॅप डाउनलोड करावे लागेल.

हे अ‍ॅप डाउनलोड केल्यानंतर युजरला 1mobile market हेही डाउनलोड करावे लागेल. कारण या अ‍ॅपशिवाय WhatsApp Who Viewed Me डाउनलोड होणार नाही. 1mobile market आपोआपच डाउनलोड होईल.

WhatsApp Who Viewed Me अ‍ॅप इन्स्टॉल झाल्यानंतर, युजर त्या लोकांना पाहू शकतात, जे तुमचा व्हॉट्सअ‍ॅप प्रोफाईल फोटो तर पाहतात, पण तुम्हाला याची माहिती नसते.

या अ‍ॅपमध्ये युजरला केवळ त्या लोकांबद्दल माहिती मिळेल, ज्यांनी मागील २४ तासांत तुमचा DP पाहिला असेल. अ‍ॅप युजरसमोर Contact कॅटेगरी ठेवेल, ज्यात App तुमचा फोटो पाहणाऱ्यांची लिस्ट समोर ठेवेल.

हे अ‍ॅप स्मार्टफोनमध्ये डाउनलोड करण्याआधी पूर्णपणे वेरिफाय करा. सध्या हे अ‍ॅप युजर्ससाठी किती सेफ आहे, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही.

त्यामुळे युजर्स आपल्या रिस्कवरच हे अ‍ॅप डाउनलोड करू शकतात आणि या ट्रिकचा वापर करू शकतात, असे सांगितले जात आहे.

Read in English