Photos: पुष्प प्रदर्शनाने बहरले पुण्यातील एम्प्रेस गार्डन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2023 01:13 PM2023-01-26T13:13:44+5:302023-01-26T13:26:53+5:30

शहरातील एम्प्रेस बोटॅनिकल गार्डनमध्ये बुधवारी पुष्प प्रदर्शनाला सुरुवात झाली असून, हे प्रदर्शन २९ जानेवारीपर्यंत सकाळी ९ ते रात्री ८ पर्यंत खुले राहणार आहे. ॲग्री हॉर्टिकल्चर सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया या संस्थेच्या वतीने हे प्रदर्शन आयोजित केले आहे. या वर्षीचे प्रदर्शन राहुल बजाज यांच्या स्मृतीस अर्पित केले आहे. (सर्व छायाचित्रे - आशिष काळे)

- हिरवाईने नटलेले प्रदर्शनाचे प्रवेशद्वार

- फुले, वृक्ष, शोभिवंत झाडे, कुंड्या यांची छायाचित्रे टिपताना नागरिक

- विविध रंगांच्या फुलांबरोबर सेल्फी घेताना नागरिक

- जपानी पद्धतीने साकारलेल्या विविध पुष्परचना तसेच बोन्साई वृक्षांचे विविध प्रकार

- विविध गुलाबांची नावे व थोडक्यात दिलेली माहिती

- फुलांसह निरनिराळ्या प्रकारची शोभिवंत झाडे, कुंड्या, भाजीपाला, पुष्परचना, बागेच्या प्रतिकृती

- एरवी पानांनी, वेलींनी व हिरवाईने नटलेली एम्प्रेस गार्डन यानिमित्त फुलांनी बहरलेली पाहता आली

- फुलांची आकर्षक अन् लक्षवेधी लहान रोपटे