PHOTOS | मोssरया! गणेशजन्माचा 'सोनेरी' सोहळा; पुण्याच्या दगडूशेठ मंदिरात बाप्पासाठी खास पाळणा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2023 01:39 PM2023-01-25T13:39:36+5:302023-01-25T14:22:00+5:30

श्रीगणेशा पाळणा हलके हलके जोजवा... पाळण्याचा मधोमध याला ग निजवा... अशा मंगल स्वरांत पाळणा म्हणत पारंपरिक वेशातील महिलांनी गणरायाची मनोभावे प्रार्थना केली. स्वस्तिक, ओम यांसारखी शुभचिन्हे आणि गजमुखाच्या नक्षींनी सजलेल्या सुवर्णपाळण्यात यंदा श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात श्री गणेश जन्म सोहळा दुपारी १२ वाजता शेकडो गणेशभक्तांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

मंदिरावर केलेली तिरंगी फुलांची आरास व विद्युतरोषणाई अशा मनोहारी सजावटीने मंदिर परिसर अधिकच खुलला

शेकडो गणेशभक्तांनी बाप्पाचे दर्शन घेत सुख-समृध्दी नांदू दे अशी प्रार्थना सर्वांनी श्रीं चरणी केली

भक्तांनी दिलेल्या देणगीतून सुवर्णपाळणा साकारण्यात आला

पाळण्याकरिता पाच फूट उंचीचा सागवानी लाकडाचा स्टॅड तयार करण्यात आला असून त्यावर ८.५ किलो चांदी वापरण्यात आली. तसेच त्यावर सोनाचे पॉलिश देखील करण्यात आले आहे

या स्टँडवर १६ बाय २४ इंचाचा सोन्याचा पाळणा साकारण्यात आला असून त्याकरिता २ किलो २८० ग्रॅम सोन्याचा वापर केला आहे.

बुधवारी पहाटे ४ ते सकाळी ६ यावेळेत पद्मश्री उस्मान खान यांनी सतारवादनातून श्रीं चरणी स्वराभिषेक अर्पण केला

सोनियाचा पाळणा, रेशमाचा दोर ग, मधोमध विसावला,माझा गणराज ग...असे म्हणत यंदाचा जन्मोत्सव सुवर्णपाळण्यात झाला.

सायंकाळी ६ वाजता श्रीं ची पालखीतून नगरप्रदक्षिणा मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये फुलांनी सजविलेला आकर्षक रथ, बंड आदी सहभागी झाले होते.

गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी पुण्यासह देशभरातून आलेल्या गणेश भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली