Sleep: रात्री झोप येत नाही? करा हे उपाय, लागेल शांत झोप

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2022 10:29 PM2022-06-11T22:29:04+5:302022-06-11T22:32:52+5:30

Sleep: अनेक लोक रात्री झोप येत नसल्याच्या तक्रारीशी झुंजत असल्याचे दिसून येते. काही जण या समस्येकडे दुर्लक्ष करतात. मात्र ज्योतिषशास्त्रानुसार रात्रीच्यावेळी वारंवार झोपमोड होण्याचा संबंध ग्रहांशी असतो. याचा थेट संबंध राहूशी असतो. तसेच शुक्र ग्रह कन्या राशीमध्ये कनिष्ठ स्थानी असल्यावर किंवा पाप ग्रहांच्या बाराव्या स्थानावर असल्यावर असं होतं. त्यावर उपाय पुढीलप्रमाणे.

अनेक लोक रात्री झोप येत नसल्याच्या तक्रारीशी झुंजत असल्याचे दिसून येते. काही जण या समस्येकडे दुर्लक्ष करतात. मात्र ज्योतिषशास्त्रानुसार रात्रीच्यावेळी वारंवार झोपमोड होण्याचा संबंध ग्रहांशी असतो. याचा थेट संबंध राहूशी असतो. तसेच शुक्र ग्रह कन्या राशीमध्ये कनिष्ठ स्थानी असल्यावर किंवा पाप ग्रहांच्या बाराव्या स्थानावर असल्यावर असं होतं. त्यावर उपाय पुढीलप्रमाणे.

चंदन राहुचे दोष आणि राहूचा प्रभाव कमी करतो, असं सांगतात. त्यामुळे झोपण्याच्या खोलीत चंदनाच्या सुवासाचा प्रयोग करता येऊ शकतो. राहूच्या दशेदरम्यान चंदनाचा साबण आणि अगरबत्ती आदींचा प्रयोग करा.

असे सांगतात की, राहूच्या प्रभावाला कमी करण्यासाठी खोलीमध्ये गाद्या आठवड्यातून एकदा उन्हात अवश्य घेऊन जा. तसेच खोलीमधील बेडशिट दोन दिवसांनंतर बदला. त्याबरोबरच झोपण्यापूर्वी हातपाय व्यवस्थित धुवा, त्यामुळे राहू दोष दूर होतो.

ज्योतिषशास्त्रानुसार बेडखाली स्वच्छता ठेवल्याने सकारात्मक उर्जेचा संचार होतो. तसेच चांगली झोपही येते. बेडखालील अनावश्यक सामान नकारात्मक उर्जेला बळ देते. त्यामुळे राहूचा प्रभाव वाढतो. त्यामुळे व्यक्तीच्या मनात वेगवेगळे विचार येतात.

जर रात्री झोपेची समस्या असेल तर राहू दोष याचं कारण असू शकतं. अशा परिस्थितीत जवचं दान उशाला ठेवा आणि सकाळी कुणाला तरी दान करा. किंवा कबुतर किंवा इतर पक्ष्यांना खाऊ द्या.

जर तुम्हाला मानसिक शांतता हवी असेल तर झोपण्यापूर्वी बेडखाली पाणी ठेवा. सकाळी हे पाणा झाडांना घाला. तसेच मुली शिवलिंगावर अर्पण करा. त्यामुळे ग्रहांच्या अशुभ प्रभावापासून शांतता मिळेल.