IIT मधून शिक्षण, वयाच्या 24 व्या वर्षी झाली अधिकारी; IAS होण्यासाठी 'या' गोष्टींचा केला त्याग

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2023 12:41 PM2023-09-24T12:41:23+5:302023-09-24T12:51:17+5:30

जयपूरच्या नेहा ब्याडवालची सरकारी अधिकारी बनण्याची गोष्ट खूपच रंजक आहे.

ज्या वयात तरुणाई सोशल मीडियावर रील्स पाहत आहे, इन्फ्लुएन्सर बनण्याचा प्रयत्न करत आहे, मैत्रीत व्यस्त आहे, त्याच वयात नेहा ब्याडवाल या गोष्टींपासून दूर राहून आयएएस अधिकारी बनली आहे. जयपूरच्या नेहा ब्याडवालची सरकारी अधिकारी बनण्याची गोष्ट खूपच रंजक आहे.

UPSC नागरी सेवा परीक्षा ही जगातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे. अभ्यास आणि प्रामाणिकपणाने प्रयत्न केल्यानंतरच ही परीक्षा पास होता येते. आयएएस नेहा ब्याडवालच्या यांनी देखील या परीक्षेत घवघवीत यश संपादन केलं आहे. नेहा मूळची राजस्थानमधील जयपूर जिल्ह्यातील जामवरमगड तहसीलची आहे.

नेहाचे वडील प्रल्हाद ब्याडवाल हे PHED मध्ये सीनियर अकाउंटेट डिव्हिजनल ऑफिसर आहेत आणि आई रजनी देवी गृहिणी आहेत. नेहाची मोठी बहीण निशा इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसमध्ये अधिकारी आहे.

बहिणीपासून प्रेरणा घेऊन नेहाने सरकारी नोकरीची तयारी सुरू केली. नेहा ब्याडवालने 12वी बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण होताच JEE परीक्षा उत्तीर्ण केली. आयआयटी कानपूरमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली.

नागरी सेवा परीक्षेच्या (UPSC Civil Services Exam) पहिल्याच प्रयत्नात ती नापास झाली होती. यानंतर अभ्यासाची रणनीती बदलली. यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी नेहाला अनेक गोष्टींचा त्याग करावा लागला. तिने स्वतःला तीन गोष्टींपासून पूर्णपणे दूर केले होते.

तीन वर्षांपासून नेहा ब्याडवाल सोशल मीडिया, मित्र, नातेवाईक आणि पार्टी फंक्शन्सपासून दूर राहिली. तिचा त्याग कामी आला आणि ती UPSC परीक्षा 2020 मध्ये 260 व्या क्रमांकासह IAS अधिकारी बनली. नेहा 2021 च्या बॅचची अधिकारी आहे.

नेहा ब्याडवाल UPSC ची मार्कशीट सोशल मीडियावर शेअर करत Instagram वर परतली होती. नेहाला लेखी परीक्षेत एकूण गुण 809 होते आणि तिने पर्सनॅलिटी टेस्टमध्ये 151 गुण मिळवले. तिची फायनल टोटल 960 होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. (सर्व फोटो - hindi.news18)