लोकसभा निवडणूक 2024: 40 सभा, 144 जागा; PM मोदींच्या मदतीनं भाजपनं तयार केला विजयाचा मोठा प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2022 11:29 PM2022-10-08T23:29:49+5:302022-10-08T23:36:54+5:30

"यावेळी भाजप अशा 144 लोकसभा जागांवर आपले लक्ष केंद्रित करत आहे, ज्या 2019 च्या निवडणुकीत त्यांना जिंकता आल्या नाही."

देशात 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. भाजपनेही 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी प्लॅनिंग सुरू केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी भाजप अशा 144 लोकसभा जागांवर आपले लक्ष केंद्रित करत आहे, ज्या 2019 च्या निवडणुकीत त्यांना जिंकता आल्या नाही. आता या जागाही आपल्याकडे वळविण्यासाठी भजप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तब्बल 40 सभा घेण्याची योना आखत आहे.

सूत्रांच्या हवाल्याने न्यूज18 ने म्हटले आहे, की भाजपने या 144 लोकसभा जागा 40 क्लस्टर्समध्ये विभाल्या आहेत. यांपैकी निवडणुका होणाऱ्या राज्यांमध्ये येणाऱ्या जागांवर पंतप्रधान मोदींच्या सर्वप्रथम सभा होतील. पंतप्रधान मोदी हे प्रत्येक क्लस्टरमध्ये एका रॅलीला संबोधित करतील.

याशिवाय पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा आणि इतर केंद्रीय मंत्री लोकसभेच्या इतर जागांवर प्रचार करतील. तसेच, भाजप शासित राज्यांतील मुख्यमंत्री आणि इतर नेत्यांना विधानसभा पातळीवर जनसंपर्क अधिक मजबूत करण्याची जबाबदारी आणि असंतोषाच्या मुद्द्यांवर संबोधित करण्यास सांगितले गेले आहे.

माध्यमांतील वृत्तांनुसार, भाजपने या क्लस्टर प्रभारींना जागानिहाय मोहीम राबवण्यास आणि निवडून आलेल्या प्रतिनिधींना बोर्डावर घेण्यास सांगितले आहे. क्लस्टर प्रभारींना 2024 च्या निवडणुकीपर्यंत दर महिन्याला एक प्रवास आणि एका लोकसभा मतदार संघात दीर्घकाळ थांबण्यास सांगण्यात आले आहे. या अंतर्गत एका क्लस्टरला तीन महिन्यात पूर्ण करण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे.

मंत्र्यांनाही देण्यात आली आहे खास जबाबदारी - सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या मंत्र्यांना या क्लस्टर्सचे प्रभारी बनवण्यात आले आहे. त्यांना सात्याने आपल्या भागाचा दौरा करावा लागेल. तसेच आवश्यकतेनुसार, रणनितीत सुधारणा करण्यासाठी फिडबॅक देण्याबरोबरच, त्या जागांवर राजकीय अथवा इतर मुद्द्यांवर आवश्यक ती कारवाई करण्यासंदर्भात सांगावे लागेल.

याशिवाय, पक्षाने नियुक्त केलेल्या लोकसभा पदाधिकाऱ्यांसाठी रात्री विश्राम, प्रमुख मतदार गटांसह साप्ताहिक बैठका आणि माध्यमांसोबत सातत्याने चर्चा करणेही आवश्यक असले. तसेच त्यांना, जाती समूहांसोबत जोडले जाणे, धार्मिक स्थळांना भेटी देणे, घरो-घरी जाऊन प्रचार करणे. गेट मीटिंग्सचे आयोजन करणे. लष्करातील जवान, शारीरिकदृष्ट्या अपंग आणि प्रवासी मतदारांसोबत संपर्क करण्यास सांगण्यात आले आहे.

सूत्रांनी सांगितल्यानुसार, पक्षाच्या या क्लस्टर प्रभारींना जनसंपर्क आणि संघटनेला बळकटी मिळेल, असे कार्यक्रम राबविण्याचे तसेच प्रत्येक लोकसभा मतदारसंघात किमान तीन दिवस भेट देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या कालावधीत अल्पकालीन प्रवास टाळण्यासाठी, संबंधित मंत्र्याचे कार्यालय आणि जागा प्रभारी यांच्यात चांगला समन्वय असणे आवश्यक आहे, असे पक्षाकडून सांगण्यात आले आहे.