महाप्रलयाचे संकेत, २०५० पर्यंत भारतातील या ९ राज्यांवर कोसळेल नैसर्गिक आपत्तीचा कहर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2023 01:04 PM2023-02-21T13:04:27+5:302023-02-21T13:08:57+5:30

Climate Risk: वातावरणातील बदलांच्या दुष्परिणामामुळे वेगवेगळे परिणाम दिसून येत आहेत. गेल्या अनेक दशकांपासून लागलेल्या वैज्ञानिक शोधामधून वातावरणातील बदलांच्या परिणामाबाबत इशारा देण्यात आलेला आहे. आता पुन्हा एकदा २०५० पर्यंत जगभरातील ५० प्रांतामध्ये येणाऱ्या नैसर्गिक आपत्तींबाबत धोक्याच्या इशारा देण्यात आला आहे. यात भारतातील ९ राज्यांचा समावेश आहे.

वातावरणातील बदलांच्या दुष्परिणामामुळे वेगवेगळे परिणाम दिसून येत आहेत. गेल्या अनेक दशकांपासून लागलेल्या वैज्ञानिक शोधामधून वातावरणातील बदलांच्या परिणामाबाबत इशारा देण्यात आलेला आहे. आता पुन्हा एकदा २०५० पर्यंत जगभरातील ५० प्रांतामध्ये येणाऱ्या नैसर्गिक आपत्तींबाबत धोक्याच्या इशारा देण्यात आला आहे. यात भारतातील ९ राज्यांचा समावेश आहे.

लोकसंख्येच्या दृष्टीने देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशचाही या यादीमध्ये समावेश आहे. येथे या आधीही पाऊस आणि उष्णतेच्या लाटेचा सामना लोकांनी केला आहे. बदलत्या वातावरणातील बदलांमुळे धोका आणखी वाढला आहे.

सन २०५० पर्यंत जगभरातील अनेक देशांवर नैसर्गित आपत्तीचे संकट कोसळणार आहे. यात भारतातील ९ राज्यांचा समावेश आहे. यात महाराष्ट्राची राजधानी आणि भारताची आर्थिक राजधानी मुंबई सर्वाधिक संकटात आहे.

बिहारची राजधानी पाटणासह सर्व जिल्ह्यांमध्ये तापमान अचानक वाढते. तर कधीकधी मुसळधार पावसामुळे पूरस्थितीसारखी परिस्थिती निर्माण होते. रिपोर्टनुसार बिहारसुध्या २०५० पर्यंत नैसर्गिक आपत्तीच्या फेऱ्यात अडकणार आहे.

गेल्यावर्षी मैंडूस चक्रिवादळामुले तामिळनाडूमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. हे पहिल्यांदाच घडलेले नाही. तामिळनाडूमध्येही नेहमी पूरस्थिती निर्माण होते. हा भाग नेहमीच रिस्क झोनमध्ये राहतो. या रिपोर्टनुसार तामिळनाडूलाही नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागेल.

पंजाबमध्येही दुष्काळ किंवा अतिवृष्टीने सर्वसामान्यांचे जगणे कठीण केले आहे. सध्या पंजाब आणि हरियाणामध्ये गरमी वाढू लागली आहे. या रिपोर्टनुसार २०५ पर्यंत पंजाबलाही वातावरणातील बदलांचा धोका आहे.

केरळमध्ये अनेकदा मुसळधार पाऊस आणि पुरामुळे मोठ्या प्रमाणावर लोकांचे मृत्यू झाले होते. दक्षिण आणि मध्य केरळमध्ये अवकाळी पावसाचा धोका अधिक असतो. गेल्या वर्षी पावसामुळे अचानक पूर आला होता.

वातावरणातील बदलांचा फटका गुजरातलाही बसला होता. येथे दोन वर्षांपूर्वीपासून तापामानातील वाढ दिसून आली होती. यावर्षी गुजरातमधील अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस पडला होता. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचेही नुकसान झाले होते.

भारताच्या पूर्वोत्तर भागात असलेल्या आसामलाही वातावरणातील बदलांचा धोका आहे. आसाममधील वातावरणातील बदलांचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार आहे.