CoronaVirus News : बापरे! मे महिन्यापर्यंत तब्बल 64 लाख लोकांना कोरोनाचा संसर्ग, ICMRचा धक्कादायक खुलासा By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2020 09:02 AM 2020-09-11T09:02:32+5:30 2020-09-11T09:11:42+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच ICMR ने केलेल्या पहिल्या राष्ट्रीय सीरो सर्वेक्षणांचा निकाल समोर आला आहेत. यामधून कोरोनाबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशात दिवसागणिक कोरोनाचा धोका वाढताना दिसत आहे. कोरोना चाचण्या, क्वारंटाईन, मास्क, सोशल डिस्टंसिंग याच्या माध्यमातून काळजी घेतली जात असतानाच रुग्णांच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे.
देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच ICMR ने केलेल्या पहिल्या राष्ट्रीय सीरो सर्वेक्षणांचा निकाल समोर आला आहेत. यामधून कोरोनाबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मे महिन्याच्या सुरुवातीला, 0.73% प्रौढ म्हणजेच तब्बल 64 लाख (64,68,388) लोक कोरोना व्हायरसच्या संपर्कामध्ये होते असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
सर्वेक्षणानुसार, प्रत्येक RT-PCR चाचणीत एक पॉझिटिव्ह प्रकरण समोर येत होतं. त्यावेळी 82-130 अशी संक्रमणाची प्रकरणं समोर होती. कोरोनाची जेव्हा देशभर लॉकडाऊन सुरू होता तेव्हा कोरोनाची अशी अवस्था होती.
सीरो सर्वेक्षणातून ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाची एकही प्रकरण समोर आलं नाही. त्या जिल्ह्यांमध्येही कोरोनाचा संसर्ग पसरल्याचं समोर आलं आहे. कोरोनाचा धोका वाढत आहे.
रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही किंवा कमी रुग्ण आढळले अशा ठिकाणी कोरोना चाचण्याच कमी प्रमाणात झाल्या असाव्यात.
चाचण्यांची संख्या वाढवणं गरजेचं आहे. जेणेकरून रुग्णांबाबत माहिती मिळणं सोपं होतं. तसेच काही ठिकाणी लॅब वाढण्याची गरज असल्याचंही यामध्ये म्हटलं आहे.
ग्रामीण भागात सेरो पॉझिटिव्हिटीचं प्रमाण सर्वाधिक म्हणजे 69.4 टक्के होतं तर शहरी झोपडपट्ट्यांमध्ये ते 15.9 टक्के आणि शहरी नसलेल्या झोपडपट्ट्यांमध्ये 14.6 टक्के नोंदवलं गेलं आहे.
18-45 वर्षे (43.3) वयोगटात सीरो पॉझिटिव्हिटी सर्वाधिक असून 46-60 वर्षे (39.5) आणि 60 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील सर्वांत कमी सेरो पॉझिटिव्हिटी आहे.
एकूण संक्रमित झालेल्यांपैकी 18.7 टक्के लोक हे सगळ्यात जास्त धोका असणाऱ्या व्यक्तीच्या संपर्कात येत होते. अनेक जिल्ह्यांमध्ये हे संक्रमण कमी होतं.
भारत हा तेव्हा महाभयंकर संकटाच्या सुरुवातीच्या टप्प्यात होता. असंख्य लोकांना अजूनही कोरोनाचा धोका आहे. त्यामुळे कन्टेंनमेंट झोनवर लक्ष ठेवणं गरजेचं असल्याचं समोर आलं आहे.
11 मे ते 4 जून या वेळेत देशातील 21 राज्यांमधील 70 जिल्ह्यांचा समावेश असलेल्या 700 गावे व प्रभागांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
कोरोनामुळे देशामध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी कोरोनाचे नवे हॉटस्पॉट समोर येत आहेत. रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसून येत आहे.
कोरोनाच्या लढ्यात अनेकांनी हे युद्ध जिंकलं असून कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांच्या संख्येतही वाढ होत आहेत.