सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील सेल्फी पॉइंट ठरतोय आकर्षणाचा केंद्रबिंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2017 18:21 IST2017-08-21T18:08:54+5:302017-08-21T18:21:20+5:30

काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून वैभववाडी तालुक्यात साकारलेलं सेल्फी पॉइंट पर्यटनाचा टर्निंग पॉइंट ठरला आहे.
सेल्फी पॉइंटवरून फोटोसेशनसाठी कॉलेजियन तरुण-तरुणी विशेष गर्दी करत आहेत
वटवृक्षांच्या आधारे उभारलेलं हे सेल्फी पॉइंट वैभववाडीच्या वैभवात भर घालणारं आहे.
सेल्फी पॉइंट शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्यामुळे फोटो काढण्यासाठी तिथे गर्दी होतेय.
वैभववाडीतील अनेकांच्या मोबाईलमध्ये या सेल्फी पॉइंटवरून काढलेले फोटो पाहायला मिळतील.