आमदार नितेश राणे रमले शेतात; नवा लूक पाहून सगळ्यांनाच बसला आश्चर्याचा धक्का - पाहा PHOTO

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2022 03:19 PM2022-07-07T15:19:06+5:302022-07-07T15:27:45+5:30

शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री पदी विराजमान झाले असून, आता कुणाची मंत्रीपदावर वर्णी लागणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले असतानाच आमदार नितेश राणे हे शेतीत रमल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे

राज्याच्या राजकारणात आमदार नितेश राणे हे नेहमी ट्विटर आणि फेसबुकच्या माध्यमातून विरोधकांवर तुटून पडताना दिसतात. मात्र, गुरुवारी ते आपल्या मुळ गावी म्हणजेच कणकवली तालुक्यातील वरवडे येथे चक्क शेती करताना दिसून आले.

नितेश राणे यांना शेतात काम करताना पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. स्वतः राणे यांनी हे फोटो ट्विट केले असून या फोटोत ते भात लागवड करताना दिसत आहेत.

एवढेच नाही, तर त्यांनी शेअर केलेल्या या फोटोंमध्ये ते, शेतात काम करताना नांगर हाकताना आणि ट्रॅक्टर चालवतानाही दिसत आहेत.

यावेळी राणे यांनी आपल्या सहकाऱ्यां समवेत शेतातच सकाळचा नाष्टा ही केला.

राणे यांचा हा नवा लूक बघून सगळेच जण आश्चर्य चकित झाले आहेत. त्यांनी आपल्या मूळ गावी शेती करत असल्याचे म्हटले आहे.

दोन दिवसापूर्वी आमदार भास्कर जाधवही शेतात काम करताना दिसून आले होते. यानंतर राणे हे पहिल्यांदाच आपल्या शेतात शेती काम करतना दिसून आले.

राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली असून महाविकास आघाडीचे सरकार खाली खेचून भाजपने शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या मदतीने नवे सरकार बनवले आहे. शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री पदी विराजमान झाले असून, आता कुणाची मंत्रीपदावर वर्णी लागणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले असतानाच आमदार नितेश राणे हे शेतीत रमल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे

शेतातील कामगारांसोबत भात लागवड करताना नितेश राणे...