मोठाले दात असूनही न चावताच शिकारीला थेट का गिळते मगर? जाणून घ्या कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2022 03:15 PM2022-07-18T15:15:41+5:302022-07-18T15:24:17+5:30

Crocodiles Do Not Eat Food: अनेकांना हे माहीत नसेल की, मगर आपली शिकार पकडण्यासाठी दातांचा वापर करते, पण खाण्यासाठी दातांचा वापर करत नाही. मगर शिकार थेट गिळते

Crocodiles Do Not Eat Food: मगरीला जगातल्या सर्वात खतरनाक प्राण्यांपैकी एक मानलं जातं. मगर एक झटक्यात मनुष्याला गिळू शकते. पाण्यात राहणारा सर्वात खतरनाक शिकारी मगर आपली शिकार बघताच इतकी चपळ होते की, काही सेकंदात शिकार तिच्या पोटात असते. इकदा का मगरीने पकडलं तर वाचणं अवघड. मगरीचा टोकदार आणि लांब दात बघून तर कुणाचाही थरकाप उडतो. पण अनेकांना हे माहीत नसेल की, मगर आपली शिकार पकडण्यासाठी दातांचा वापर करते, पण खाण्यासाठी दातांचा वापर करत नाही. मगर शिकार थेट गिळते.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, मगर दाताने शिकार चावत का नाही? मगर का शिकार थेट गिळते? तर याचं उत्तर आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. मगरीचे दात शिकार खाण्याच्या कामात येत नाहीत. ते केवळ जबड्याला मजबूत बनवतात. एकदा का शिकारीला तोंडात पडकलं तर वाचणं अवघड असतं.

या खतरनाक प्राण्याच्या तोंडात फारच टोकदार आणि मोठाले दात असतात. पण त्यांची बनावट किंवा संरचना अशी असते की, ते केवळ शिकारीला पकडण्याच्या कामात येतात. मगर शिकारीला या दातांनी चावून खाऊ शकत नाही.

मुळात हेच कारण आहे की, मगर शिकार पकडल्यानंतर थेट गिळते. त्यासोबतच तुम्हाला हे वाचूनही आश्चर्य वाटेल की, मगरीला चार पोट असतात. या पोटात मगर आपली शिकार तोडून-मोडून पचवते.

मगरीच्या पोटात इतर प्राण्यांच्या तुलनेत जास्त प्रमाणात गॅस्ट्रिक अॅसिड असतं. जे न चावताही खाल्लेल्या शिकारीला पचवण्याचं काम करतं. मियामी सायन्स म्युझिअमच्या एक्सपर्टने सांगितलं की, ऑस्ट्रिचप्रमाणे मगरही छोटी छोटी दगडं खाते, ते पोटातील अन्नाला चांगल्याप्रकारे ग्राइंड करतात.

तज्ज्ञांनुसार मगर जेव्हा एखादी मोठी शिकार करते तेव्हा पुढचे काही दिवस तिला काहीच खाण्याची गरज पडत नाही. कारण मोठी शिकार पोटात पचण्यासाठी हळूहळू 10 दिवसांचा वेळ लागतो. या दरम्यान मगर शांत बसलेली असते.

एक मगर एकावेळी 12 ते 48 अंडी देते. ते फुटण्यात 55 ते 100 दिवसांचा वेळ लागतो. तेच मगरींचं आयुष्य त्यांच्या प्रजातीवर अवलंबून असतं. काही मगर 40 वर्ष तर काही 80 वर्ष जगतात.