लिपस्टिकमधून उलगडात महिलांची ही गुपितं, बिचाऱ्या पुरुषांना अजून माहीतचं नाही, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2023 01:37 PM2023-03-24T13:37:36+5:302023-03-24T13:43:25+5:30

Lipstick Opens These Secrets of Womens: बऱ्याचशा तरुणी आणि महिला ओठांचं सौंदर्य वाढवण्यासाठी लिपस्टिकचा वापर करतात. आजकाल तर तरुणी कमी वयापासूनच लिपस्टिकचा वापर करतात. प्रत्येक महिला, तरुणीला वेगवेगळ्या प्रकारच्या लिपस्टिकचे रंग आणि शेड्स आवडतात. मात्र महिलांकडून वापरण्यात येणारे लिपस्टिक त्यांच्याबाबतची अनेक गुपिते उघड करते.

बऱ्याचशा तरुणी आणि महिला ओठांचं सौंदर्य वाढवण्यासाठी लिपस्टिकचा वापर करतात. आजकाल तर तरुणी कमी वयापासूनच लिपस्टिकचा वापर करतात. प्रत्येक महिला, तरुणीला वेगवेगळ्या प्रकारच्या लिपस्टिकचे रंग आणि शेड्स आवडतात. मात्र महिलांकडून वापरण्यात येणारे लिपस्टिक त्यांच्याबाबतची अनेक गुपिते उघड करते.

हो, लिपस्टिक महिला, तरुणींच्या व्यक्तिमत्त्वाबाबतची अनेक गुपितं उघड करते. मात्र त्याबाबत फारच थोड्या लोकांना माहिती आहे. प्रत्येक महिला आणि तरुणी आपल्या आवडीप्रमाणे लिपस्टिक वापरतात. काही महिलांना डार्क कलरची तर काहींना लाईट शेड्सची लिपस्टिक आवडते. त्यांची ही आवड त्यांच्याबाबतची अनेक गुपितं उघड करते. त्याबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

ज्या तरुणींना लाल रंगाची लिपस्टिक अधिक आवडते, ती त्यांचा हाल लेव्हल कॉन्फिडन्स दर्शवते. त्यावरून समोरील तरुणी किंवा महिला ही खूप महत्त्वाकांक्षी आहे, हे कळते. अनेकदा त्या अॅग्रेसिव्ह किंवा डिफेन्सिव्ह वर्तनही करतात. लाल लिपस्टिक लावणाऱ्या तरुणी आणि महिला आपली बलस्थानं आणि कमकुवत बाजूबाबत बऱ्यापैकी जाणून अलतात. त्यासोबतच त्यांना आपल्या लोकांवर आणि कुटुंबावर पैसे खर्च करायला आवडतात.

काही तरुणींना न्यूड कलरची लिपस्टिक लावायला आवडते. त्यावरून समोरील तरुणी ही क्लासिक आणि सोफिस्टिकेटेड असल्याचे समजते. न्यूड लिपस्टिक लावणाऱ्या तरुणी आणि महिला लाजाळू स्वभावाच्या असतात. त्यांना थोडं रिझर्व्ह राहायला आवडतं. न्यूड लिपस्टिक लावणारी तरुणी तुम्हाला घमेंडखोर किंवा कठोर स्वभावाची वाटू शकते. मात्र आतून त्या खूप मृदू असतात. न्यूड लिपस्टिक लावणाऱ्या महिलांना डाऊन टू अर्थ राहायला आवडते. त्या लाईफबाबत खूप प्रॅक्टिकल असतात. तसेच त्यांना लोकांमध्ये मिसळायला आवडते.

बऱ्याचदा तुम्ही पाहिले असेल की, बहुतांश तरुणींबाबत सांगितले जाते की, त्यांना पिंक कलर खूप आवडतो. जर तुमची पार्टनर किंवा गर्लफ्रेंड पिंक कलरची लिपस्टिक लावत असेल. तर ती लहान मुलांसारख्या स्वभावाची असेल. अशा तरुणी खूप एनर्जेटिक असतात. पिंक कलरची लिपस्टिक लावणाऱ्या तरुणींना पार्टी कऱणे आणि सर्वात मिसळून राहायला आवडते. त्यांची लवकर मैत्री होते. त्या रिस्क टेकर आणि अॅडव्हेंचरस असतात. या तरुणींना नव्या ठिकाणी जायला, नव्या लोकांना भेटायला आणि नव्या गोष्टी शिकायला आवडते.

ज्या तरुणींना वाइन कलरची लिपस्टिक लावायला आवडते. त्यांचा स्वभाव खूप बोल्ड असतो. त्या तरुणींना इतरांचं लक्ष वेधून घेण्याची कला अवगत असते. त्यांना लाऊड म्युझिक ऐकायला आवडते.

सध्या तरुणींमध्ये प्लम किंवा ब्राऊन कलरच्या लिपशेड्स खूप आवडतात. पण ही लिपशेड पसंद करणाऱ्या तरुणी आणि महिला लवकर कंटाळतात. हे तुम्हाला माहिती आहे का? त्यांना आव्हानांची भीती वाटते. त्यांना कुठल्याही प्रकारच्या आव्हानांचा सामना करण्याची इच्छा नसते. तसेच त्या आपली गुपितं लपवून ठेवतात.