परदेशात 'या' गोष्टी केल्यास होऊ शकते कडक कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2019 06:00 PM2019-12-27T18:00:04+5:302019-12-27T18:28:31+5:30

साधारणपणे लोकांना असं वाटतं असतं की परदेशात तुम्ही ड्रींक करणे किंवा किसींगबाबत काहीही केले तरी त्यात फार काही गैर नसतं. पण जर तुम्हाला माहीत आहे का बाहेरच्या देशात सुध्दा जर तुम्ही काही गोष्टी पब्लिक प्लेसवर करत असाल तर तुम्हाला महागात पडू शकतं. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या देशात कोणती कृती करण्यास बंदी आहे.

दुबई या ठिकाणी जर तुम्ही सार्वजनिक ठिकाणी किस करताना आढळलात तर तुम्हाला जेल सुध्दा होऊ शकते.

सर्वसाधारणपणे जर आपण जेवायला गेलो तर बील शेअर करत असतो पण दक्षिण कोरीया या ठिकाणी दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणाच बील असेल तर शेअर केलं जात नाही. एकच व्यक्ती बील देत असते.

स्पेनमध्ये जर तुम्ही पब्लिक प्लेसवर शरीरसंबंध करताना आढळून आलात तर तुम्हाला लाखोंचा दंड भरावा लागू शकतो. (Image credit- femina.in)

स्पेनमध्ये जर तुम्ही सार्वजनीक ठिकाणी मद्यपान करताना आढळून आलात तर तुमच्यावर तिथल्या पोलींसांकडून कारवाई केली जाऊ शकते.

मिशिगनमध्ये जर तुमच्या जीन्समधून अंडरवेअर दिसत असेल तर तुम्हाला ३ महीने तुरुंगवास सहन करावा लागतो.

वर्जीनियामध्ये जर तुम्ही तुमच्या पार्टनरला चीट करताना आढळलात तर मोठा दंड भरावा लागू शकतो. (image credit-india.com)