Magic hair girl: फक्त केसांचा भांग बदलताच या मुलीच्या केसाचा रंगच बदलतो, जणू आहेत जादूचे केस

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2022 01:39 PM2022-02-04T13:39:35+5:302022-02-04T13:51:02+5:30

आपले केस कलर करण्यासाठी लोक किती तरी पैसे खर्च करतात पण या मुलीला नैसर्गिकरित्याच असे केस मिळाले आहेत, जे ती आपल्या कपड्यांसोबतही मॅच करते.

यूकेतील बेला हिज नावाची ही ११ वर्षांची मुलगी जिचे केस जादुई आहेत.

फक्त एक पार्टिशन केलं की तिच्या केसांचा रंग बदलतो.

उन्हात तिच्या केसांचा गडद रंगाचा भाग सौम्य होऊन गोल्डन दिसू लागतो तर सौम्य रंगाचा भाग बर्फासारखा दिसतो, जणू काही तिने केसांना ब्लीज केलं असंच वाटतं.

बेलाची आई जेनी हिलने दिलेल्या माहितीनुसार तिच्या मुलीचा जन्मच या विचित्र केसांसह झाला.

बेलाचे असे केस हे तिचं बर्थमार्क म्हणजे जन्मखूण म्हणून सांगितली गेली.

जेनीच्या मते, तिच्या मुलीचे केस पोलियोसिसमुळे आहेत.

ज्यामध्ये केसांच्या एका विशिष्ट भागातील पिगमेन्टेशन कमी होतात.

यामुळे तिच्या शरीराला काहीच धोका नाही. पण तिच्या डोक्याव्यतिरिक्त त्वचेवरील केसांचा रंगही वेगवेगळा असेल.

या अशा विचित्र केसांचा बेलाला असा फायदा होतो की तिला आपल्या केसांचा रंग पाहिजे तेव्हा बदला येतो.

याला तिने स्टाइल स्टेटमेन्ट बनवलं आहे. आपल्या ड्रेसनुसार ती आपले केस ठेवते.