Wuhan Lab: बापरे! जगभरात वुहानसारख्या 59 लॅब; व्हायरस पसरण्याचा धोका 'बॉम्बसारखा'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2021 06:52 PM2021-06-05T18:52:55+5:302021-06-05T18:57:36+5:30

world in Danger Wuhan Lab: व्हायरस बाबतचे संशोधन अख्ख्या जगभरात सुरु असते. तेथेही असे अपघात होत असतात. यामुळे वुहानमध्ये जे झाले तो एक अपघात होता, असे समजले जावे असे वैज्ञानिकांच्या एका गटाचे म्हणणे आहे.

कोरोना व्हायरस हा चीनच्या वुहान लॅबमध्येच (Wuhan Institute) बनल्याचे आता जवळपास साऱ्याचे देशांनी मान्य केले आहे. तसे पुरावेही सापडू लागले आहेत. वुहानच्या लॅबमधूनच हा व्हायरस जगभरात पसरला आणि लाखो लोकांचे जीव घेतले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी तपास वेगाने करण्याचे आदेश दिले आहेत. 90 दिवसांत गुप्तचर यंत्रणेला अहवाल देण्यास सांगितले आहे. (At least 59 maximum biosafety level 4 labs (BSL-4) are planned, under construction or in operation across the world)

असे असले तरी देखील व्हायरस बाबतचे संशोधन अख्ख्या जगभरात सुरु असते. तेथेही असे अपघात होत असतात. यामुळे वुहानमध्ये जे झाले तो एक अपघात होता, असे समजले जावे असे वैज्ञानिकांच्या एका गटाचे म्हणणे आहे.

द फाय़नान्शिअल टाईम्समध्ये शुक्रवारी एक रिपोर्ट छापण्यात आला आहे. यामध्ये जगभरात वुहानसारख्या 59 लॅब असल्याचे म्हटले आहे. यापैकी काही निर्माण करण्यात येत आहेत. तिथेही जैविक प्रयोग आणि संशोधन केले जाते, भविष्यतही केले जाईल.

गेल्या दशकभरापासून अशा लॅबची संख्या वेगाने वाढली आहे. या प्रयोगशाळा 23 देशांमध्ये आहेत. यामध्ये ब्रिटन, अमेरिका, चीन, भारत, गैबॉन आणि आयव्हरी कोस्टदेखील देश आहेत. वुहानची प्रयोगशाळा ही याच 59 देशांपैकी एक आहे.

जॉर्ज मैसास विद्यापीठाचे बायोडिफेन्स प्रोफेसर ग्रेगरी कोबलेन्त्ज आणि लंडनच्या किंग्स कॉलेजचे प्राध्यापक फिलिपा लेंतोज यांनी या प्रयोगशाळांच्या बाबत अभ्यास केला आहे.

त्यांच्यानुसार ज्या 42 प्रयोगशाळांबाबत आकडे उपलब्ध आहेत, त्यापैकी निम्म्या लॅब या गेल्या दशकभरात तयार करण्यात आल्या आहेत.

लेन्तोज यांनी सांगितले की, या लॅबमध्ये ज्या प्रकारे कामे केली जात आहेत, ते पाहता यातून निम्मे अपघात होणार आहे. अमेरिकेच्या रुटगर्स यूनिव्हर्सिटीमध्ये केमिकल बायोलॉजीचे प्राध्यापक रिचर्ड एब्राइट यांनी सांगितले की, जेवढ्या जास्त लॅब होतील, त्यामध्ये जेवढे जास्त लोक काम करतील, तेवढाच जास्त धोका वाढणार आहे.

विश्लेषकांनुसार वुहानच्या प्रयोगशाळेच्या बाबतीत तपासातून जेवढे निष्कर्ष निघाले, त्याद्वारे हे स्पष्ट आहे की, कोरोना महामारीने जगभरातील व्हायरस संशोधनावर शंका उपस्थित केली आहे. सध्यातही अशा लॅबवर कोणाचेही नियंत्रण नाही.

2019 च्या एका रिपोर्टनुसार अमेरिकेमध्ये 13 वेळा असे पदार्थ गायब झाले आहेत आणि 219 वेळा लीक झाले आहेत. नशीबाची बाब म्हणजे यातून कोणीही आजारी पडला नाही.

अमेरिकेच्या सीडीसीने सांगितले की, त्यांच्या निरिक्षणाखाली 67 प्रकारचे टॉक्सिन्स आणि संभाव्य खतरनाक सामुग्रीचा वापर या प्रयोगशाळांमध्ये होतो.

Read in English