Kevin Pietersen, Russia Ukraine War : आईचं धाडस! रशिया हल्ला करत असताना 'तिने' दोन मुलांना घेऊन ओलांडली युक्रेनची सीमा; थोडक्यात बचावलं क्रिकेटपटूचं कुटुंब

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2022 03:40 PM2022-03-01T15:40:51+5:302022-03-01T15:50:41+5:30

युक्रेनच्या सीमेवरून ती कशीबशी आपल्या मुलांना घेऊन पोलंडच्या हद्दीत गेली.

Russia Ukraine War : आईचं धाडस! रशिया हल्ला करत असताना 'तिने' दोन मुलांना घेऊन ओलांडली युक्रेनची सीमा; थोडक्यात बचावलं क्रिकेटपटूचं कुटुंबरशिया आणि युक्रेन यांच्या जोरदार युद्ध सुरू आहे. रशियाने जेव्हा हल्ला केला तेव्हा एक आई आपल्या मुलांसह युक्रेनमध्ये होती. पण न घाबरता धाडसाने आणि धीराने तिने आपल्या मुलांना वाचवत युक्रेनची सीमा ओलांडली.

ती आई म्हणजे इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केविन पीटरसनची (Kevin Pietersen) पत्नी जेसिका (Jessica Pietersen) पीटरसन. पीटरसनची पत्नी आणि मुलं या हल्ल्यातून थोडक्यात बचावले. पीटरसनने सोशल मीडियावर माहिती दिली की रशियाच्या आक्रमणादरम्यान त्याचे कुटुंब युक्रेनमध्ये होते. पण त्याची पत्नी आणि मुले कसेबसे त्या देशातून बाहेर पडण्यात यशस्वी झाले.

पीटरसनचे कुटुंब रशियन आक्रमणादरम्यान युक्रेनमध्ये अडकले होते, पण सीमा ओलांडून ते कसेबसे पोलंडमध्ये पोहोचण्यात यशस्वी झाले. केविन पीटरसनने सोशल मीडियावर ही माहिती दिली. तसेच पोलंड सरकारने आपल्या देशात ४ लाख युक्रेनियन नागरिकांना आश्रय दिल्याबद्दल पीटरसनने पोलंड सरकारचे आभार मानले.

केविन पीटरसनने ट्विट करत लिहिलं की, मला एवढंच सांगायचे आहे की पोलंड हे युक्रेनियन लोकांसाठी एक सुरक्षित व चांगलं ठिकाण आहे. माझे कुटुंबही युक्रेनची सीमा ओलांडून पोलंडला गेले आहे. धन्यवाद पोलंड.

केविन पीटरसनची पत्नी जेसिका पीटरसननेही पोलंडचे आभार मानले. जेसिका पीटरसनने ट्विट केलं. 'पोलंडच्या नागरिकांनो, तुम्ही आमच्या कुटुंबाला तुमच्यात सामावून घेतलंत आणि दयाळूपणा दाखवलात त्यासाठी मी तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत.

रशियाने २४ फेब्रुवारीला युक्रेनवर हल्ला केला. रशियन सैन्याने युक्रेनमध्ये प्रवेश केला. रशियाच्या या निर्णयाचा जगभरातून विरोध होत आहे. अमेरिका आणि अनेक मोठे युरोपीय देश रशियाच्या विरोधात उभे ठाकले आहेत. त्यात केविन पीटरसनच्या कुटुंबासारखे अनेकांना आपला जीव वाचवण्यासाठी अचानक धावपळ करावी लागली.