पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसाच्या भूतान दौऱ्यावर; पाहा कसं केलं मोदींचे स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2019 04:22 PM2019-08-17T16:22:27+5:302019-08-17T16:24:58+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवसांच्या भूतान दौऱ्यासाठी शनिवारी पोहचले आहेत. द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासाठी भूतानमधील नेत्यांची ते संवाद साधणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा भूतान दौऱ्यावर गेले आहेत.

भूतानचे पंतप्रधान लोटे शेरिंग यांनी विमानतळावर मोदींना वेलकम केले. त्यांच्या आगमनावर सलामी दिली गेली. रंगीबेरंगी कपड्यांमध्ये हजारो नागरिक मोदींच्या स्वागतासाठी उभे होते.

दुसऱ्या कार्यकाळात मोदी पहिल्यांदा भूतानला गेले आहेत त्यामुळे मोदींचे भूतानमध्ये जोरदार स्वागत करण्यात आलं. हजारो महिला, मुलांनी हातात तिरंगा घेत रस्त्याच्या कडेला उभं राहून त्यांचे स्वागत केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रतिष्ठीत रॉयल यूनिवर्सिटी ऑफ भूतानमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.

दौऱ्यादरम्यान मोदी द्विपक्षीय संबंध सुधारण्यावर नेत्यांशी चर्चा करणार आहेत.