लाचखोर पोलिस अधिकाऱ्याच्या घरात सोन्याचं टॉयलेट, समोर आले आलिशान घराचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2021 03:36 PM2021-07-22T15:36:41+5:302021-07-22T15:46:19+5:30

पोलिस कर्नल एलेक्सी सफोनोववर त्याच्या 35 अधिकाऱ्यांसह माफिया टोळी चालवण्याचा

भ्रष्टाचाराचे आरोप लागल्यानंतर रशियातील एका पोलिस अधिकाऱ्याचे निलंबन करण्यात आले आहे. रशियातील स्टावरोपोल परिसरातील पोलिस कर्नल एलेक्सी सफोनोववर त्याच्या 35 अधिकाऱ्यांसह माफिया टोळी चालवण्याचा आणि लाच घेतल्याचा आरोप आहे. सध्या एलेक्सीला पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, पोलिसांनी एलेक्शीच्या आलीशान घराचे काही फोटो शेअऱ केले आहेत. फोटोंमध्ये त्याच्या घरामध्ये अनेक ठिकाणी सोन्याची सजावट केलेली दिसत आहे.

भ्रष्टाचाराच्या आरोपात निलंबन केलेल्या कर्नल एलेक्सी सफोनोवने त्याच्या घरात भव्य-दिव्य शौचालय बांधले आहे. तसेच, त्याने टॉयलेट सीटसह बेसीन आणि आरशाला सोन्याची सजावट दिली आहे.

डेलीमेलच्या रिपोर्टनुसार, 45 वर्षीय एलेक्सी सफोनोवने कथितरित्या वाहन चालकांकडून वसुली केली. याशिवाय, सफोनोवने लाच घेऊन एका धान्य ट्रांसपोर्ट करण्याऱ्या टोळीला परमिट जारी केले होते.

भ्रष्टाचार विरोधी पथकाने एलेक्सी सफोनोवच्या घरातील काही फोटो शेअर केले. त्यात सफोनोवने त्याच्या घरातील लग्झरी बेडरूममध्ये गिल्ट वॉलपेपर, महागडे पडदे आणि एक शानदार बेड घेतलेला दिसत आहे. याशिवाय, भितींवर सोन्याची सजावट दिसत आहे.

एलेक्सी सफोनोवने बाथरुम आणि बेडरुमसह किचनमध्येही सोन्याची सजावट केली आहे. किचनमध्ये संगमरवरी फरशांसह सोन्याचे झुंबर आणि आलमारी दिसत आहे.

एलेक्सीच्या घरात एक भलं मोठं सोन्याच झुंबर लावण्यात आलं आहे. यासह त्याने घरात अनेक ठिकाणी महागड्या पेटींग्सही लावल्या आहेत.

एलेक्सीने त्याच्या घराच्या छत, पायऱ्या आणि रेलिंगवर संगमरवरी टायलिंग केली आहे. तर, त्याच्यावर सोन्याची सजावट केली आहे.

भ्रष्टाचार विरोधी पथकानं एलेक्सी सफोनोवकडून आतापर्यंत 2 लाख पाउंड म्हणजेच 2.04 कोटी रुपये जप्त केले आहेत. अजूनही तपास सुरू आहे.