CoronaVirus China grants its first covid vaccine patent to CanSino
CoronaVirus News: रशियापाठोपाठ चीनची बाजी; कोरोनावरील लस लवकरच बाजारात येणार By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2020 02:28 PM2020-08-17T14:28:37+5:302020-08-17T14:43:33+5:30Join usJoin usNext कोरोना संकटामुळे संपूर्ण जगात खलनायक ठरलेला चीन आता कोरोनावरील लसीच्या संशोधन आणि उत्पादनात बाजी मारताना दिसत आहे. रशियापाठोपाठ आता चीननं कोरोना लसीच्या उत्पादनाला परवानगी दिली आहे. रशियानं स्पुटनिक व्ही लसीचं पहिल्या बॅचमधील उत्पादन केलं. तर चीनच्या CanSino Biologics कंपनीच्या Ad5-nCOV लसीच्या उत्पादनाला ग्रीन सिग्नल मिळाला आहे. रशियापाठोपाठ चीननं कोरोनावरील लस शोधली आहे. मात्र या दोन्ही लसींना आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळालेली नाही. पण रशिया, चीननं अंतर्गत वापरासाठी लसींच्या उत्पादनाला मंजुरी दिली आहे. CanSino Biologics कंपनीनं Ad5-nCOV लसीच्या स्वामित्व हक्कांसाठी अर्ज केला. तो सरकारनं मंजूर केला आहे. CanSino Biologics लस निर्मिती क्षेत्रातील प्रसिद्ध कंपनी आहे. स्वामित्व हक्क मिळवणारी ती चीनमधील पहिलीच कंपनी आहे. CanSino Biologics नं तयार केलेली लस सर्दी-तापावरील लसीची पुढील आवृत्ती आहे. यामध्ये कोरोना विषाणूच्या जेनेटिक मटेरियलचा वापर करण्यात आला आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठ-अस्त्राजेनेकाच्या लसीमध्येही याच पद्धतीचा वापर केला गेला आहे. रशियानं कोरोनावरील स्पुटनिक व्ही लसीचं पहिल्या टप्प्यातलं उत्पादन पूर्ण केलं आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, या महिन्याच्या अखेरपर्यंत लस वापरासाठी उपलब्ध होईल. रशियन लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी केला आहे. त्यांच्या मुलीलादेखील ही लस टोचण्यात आली आहे. रशियन लसीचं भारतात उत्पादन करण्यासाठी अनेक कंपन्यांसोबत बातचीत सुरू आहे. रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड अनेक भारतीय औषध कंपन्यांसोबत बातचीत करत आहे. रशियानं पाच देशांमध्ये प्रत्येक वर्षी ५०० मिलियन डोस तयार करण्याची योजना आखली आहे. भारतासोबतच कोरिया आणि ब्राझील यांच्यासोबतही संवाद सुरू आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं मात्र कोरोनावरील लस येण्यास अजून काही महिन्यांचा अवधी लागेल, असं म्हटलं आहे. सर्वसाधारणपणे लस तयार करण्यास ५ ते १० वर्षांचा कालावधी लागतो. पण सध्याचं संकट पाहता लस येण्यास किमान दीड वर्ष लागतील, असं जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांनी म्हटलं आहे.टॅग्स :कोरोना वायरस बातम्याcorona virus