घरीच करा 10 मिनिटांसाठी या 5 एक्सरसाइज; फक्त एकाच महिन्यामध्ये होइल वजन कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2019 03:09 PM2019-03-02T15:09:40+5:302019-03-02T15:15:24+5:30

संपूर्ण देशातील लोकांना सतावणारी लठ्ठपणा ही एक गंभीर समस्या आहे. ज्यामुळे शरीराला इतरही अनेक आजारांचा सामना करावा लागतो. जर तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत असाल आणि तुमच्याकडे जिममध्ये जाण्यासाठी पूरेसा वेळ नसेल तर घाबरून जाण्याची अजिबात गरज नाही. फिटनेस एक्सपर्ट इमरान खान काही मजेशीर वर्कआउट सांगणार आहेत. ज्यासाठी तुम्हाला जिममध्ये जाण्याची अजिबात गरज नाही. तुम्ही हे एक्सरसाइज कधीही घरच्या घरी करू शकता. ज्यामुळ तुम्हाला वजन कमी करणं सहज शक्य होइल.

ही एक फुल बॉडी एक्सरसाइज आहे, ज्यामुळे अनेक कॅलरी बर्न होण्यास मदत होते. यामुळे हार्ट रेट लगेच वाढतो आणि फॅट बर्न होण्यास मदत होते. यामुळे मसल्सला स्ट्रेंथ मिळते आणि बॉडी टोन्ड होण्यास मदत होते.

हा एक हाय एनर्जी वर्कआउट आहे. ज्यामुळे तुमच्या संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. जंप केल्या हार्ट रेट वाढतो आणि कॅलरी बर्न होण्यास मदत होते. याव्यतिरिक्त एक्सरसाइजमुळे आपल्याला स्ट्रेंथ मिळते.

तुम्हाला हे वर्कआउट करताना आधी कमी गतीने करणं आवश्यक आहे. प्रॅक्टिस झाल्यानंतर तुम्ही गती वाढवू शकता. यामुळे लेग्स, कोर, शोल्डर आणि एब्सवर परिणाम दिसून येतो.

वजन कमी करण्यासाठी ही सर्वात सोपी एक्सरसाइज आहे. ही एक हाय इंटेंसिटी एक्सरसाइज आहे. ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर शरीरातील कॅलरी बर्न करण्यास मदत मिळते. यामुळे लेग्ज आणि आर्म्स टोन्ड होण्यास मदत होते. ( Image Credit : The Independent)

ही एक्सरसाइज केल्यामुळे ग्लट्सवर काम होण्यास मदत होते आणि तुमचे बट आणि लेग्ज टोन होण्यास मदत होते. कॅलरी बर्न करण्यासाठी हा एक उत्तम कार्डीओ वर्कआउट आहे. यामुळे थाइज टोन्ड होण्यास मदत होते.

वजन कमी करणं आणि बॉडि टोन्ड करणं सोपी गोष्ट नाही. ही एक अनेक दिवसांपर्यंत चालणारी प्रोसेस आहे. ज्यासाठी तुम्हाला कठिण परिश्रम करणं आवश्यक आहे. एक्सरसाइजशिवाय तुम्हाला डाएटवरही लक्ष देणं गरजेचं असतं. तसेच या सर्व गोष्टी करताना तज्ज्ञांचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक ठरतं.