१८ जूनचा शनिवार पाच राशींसाठी ठरणार लकी; राहू काळात टाळा पुढील गोष्टी!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2022 10:41 AM2022-06-16T10:41:08+5:302022-06-16T10:55:41+5:30

१८ जून चा शनिवार हा अनेक अनेक ग्रह नक्षत्राच्या संयोगामुळे शुभ ठरणार आहे, त्यात शनिदेवांचा वार असल्यामुळे पाच राशींचे जातक शनी कृपेसही पात्र ठरणार आहेत. सध्या तीन राशींची साडेसाती आणि दोन राशींवर शनिप्राभाव सुरू आहे.

१८ जून रोजी पंचमी तिथी आणि श्रावण नक्षत्र आहे. शनिदेव स्वतः श्रवण नक्षत्राचे स्वामी आहेत. या दिवशी शनिदेव कुंभ राशीत संचार करतील. चंद्र मकर राशीत बसेल. कुंभ आणि मकर राशीचा स्वामी शनिदेव आहे. या सर्व परिस्थितीमुळे शनिदेवाला प्रसन्न करण्याचा शुभ संयोग होत आहे.

मकर, कुंभ आणि मीन या राशींचा साडेसातीचा प्रवास सुरु आहे तर कर्क आणि वृश्चिक या दोन राशींवर शनिदेव नजर ठेवून आहेत अर्थात या दोन्ही राशी शनिदेवाच्या प्रभावाखाली आहेत.

विशेषतः या सुमुहूर्तावर वर दिलेल्या राशीच्या जातकांनी शनिवारी शनि मंदिरात मुखोद्गत असलेल्या कोणत्याही शनी स्तोत्राचे पठण केल्यास खूप लाभ होईल. अडलेली कामे मार्गी लागतील. त्याचबरोबर पिंपळाच्या झाडाला पाण्याचे अर्घ्य देऊन मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्यास शनिकृपा होईल. काळी छत्री, चप्पल, लोखंडी वस्तूचे गरजवंताला दान केल्यास साडेसातीचा प्रभाव कमी होऊन हा काळ प्रगतीपथावर नेण्यास मदत करेल.

या दिवशी सकाळी ८.५२ ते १०. ३७ पर्यंत राहुकाल आहे. राहूकाळात वर दिलेले उपाय करू नका. राहू काळ सरून गेल्यावर शनी पूजा, स्तोत्रपठण, देवदर्शन, दानधर्म करा. तसे केल्याने होणाऱ्या प्रगतीची झलक येत्या काळात दिसून येईल.