महाशिवरात्री: ‘या’ ५ मूलांकांवर महादेवांची अपार कृपा, यश-प्रगतीचे योग; सरकारी कामांचा लाभ!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2024 10:28 AM2024-03-04T10:28:33+5:302024-03-04T10:43:22+5:30

Maha Shivratri 2024 Numerology: तुमचा मूलांक कोणता? महादेवांचे शुभाशिर्वाद कोणत्या मूलांकांच्या व्यक्तींना मिळू शकतील? जाणून घ्या...

Numerology: मार्च महिन्यात विविध प्रकारचे सण-उत्सव साजरे केले जाणार आहेत. यापैकी महिन्याच्या सुरुवातीलाच देशभरात मोठ्या प्रमाणात आणि उत्साहात महाशिवरात्री साजरी केली जाणार आहे. ०८ मार्च २०२४ रोजी महाशिवरात्री आहे. शिवनाथाच्या उपासना, नामस्मरणासाठी हा सर्वोत्तम दिवस मानला जातो.

तसेच मार्च महिन्याच्या सुरुवातीला बुध आणि शुक्र हे दोन्ही ग्रह राशीपरिवर्तन करणार आहे. ज्योतिषशास्त्राच्या अनेकविध शाखा आहेत. त्यापैकी एक म्हणजे अंकशास्त्र. अंकशास्त्रात जन्मतारखेवरून मूलांक काढला जातो आणि या मूलांकांवरून भविष्यकथन केले जाऊ शकते. या दोन्ही ग्रहांचा राशींप्रमाणे मूलांकांवरही प्रभाव पडणार आहे. बुध मूलांक ५ चा तर शुक्र मूलांक ६ चा स्वामी आहे.

ग्रहांचे गोचर आणि महाशिवरात्रीचे शुभपर्व कोणत्या मूलांकांना उत्तम ठरू शकेल? कसा लाभ मिळू शकेल? कोणत्या मूलांकांच्या व्यक्तींना महादेवांचे शुभाशिर्वाद मिळू शकतील? जाणून घेऊया...

ज्या व्यक्तींचा जन्म १, १०, २८ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक १ आहे. या मूलांकाचा स्वामी सूर्य आहे. महाशिवरात्री शुभ राहील. आर्थिक स्थिती सुधारू शकते. नवीन नोकरीची संधी मिळू शकते. यश मिळू शकते. जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतो. संपत्तीत वाढ होण्याच्या शुभ संधी मिळतील. कामाच्या ठिकाणी अचानक समस्या उद्भवू शकते. काही चांगली बातमी मिळू शकते. मन प्रसन्न राहील.

ज्या व्यक्तींचा जन्म २, ११, २०, २९ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक २ आहे. या मूलांकाचा स्वामी चंद्र आहे. व्यावसायिकांना नवीन संधी मिळू शकतात. नोकरी करणाऱ्यांसाठी काळ अनुकूल आहे. कामात येणारे अडथळे दूर होतील. संयमाने निर्णय घेतल्यास प्रगती होईल. चांगली बातमी मिळू शकेल. गुंतवणुकीवर लक्ष केंद्रीत करणे हिताचे ठरेल.

ज्या व्यक्तींचा जन्म ३, १२, २१, ३० या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ३ आहे. या मूलांकाचा स्वामी गुरु आहे. अपूर्ण कामे पूर्ण होतील. सरकारी योजनांचा लाभ मिळेल. आर्थिक लाभाच्या अनेक संधी मिळतील. कामाच्या ठिकाणी हळूहळू सुधारणा होतील. प्रकल्प वेळेत पूर्ण होतील. व्यावसायिकांना आर्थिक लाभ होऊ शकतो. परदेशात नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या लोकांना यश मिळू शकते.

ज्या व्यक्तींचा जन्म ४, १३, २२, ३१ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ४ आहे. या मूलांकाचा स्वामी राहु आहे. सुख-समृद्धी वृद्धी होऊ शकेल. जुन्या गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. नोकरी आणि व्यवसायात प्रगतीची दाट शक्यता आहे. चांगल्या कामावर पैसा खर्च होऊ शकतो. वाद टाळा. कामाच्या ठिकाणी अहंकाराचे भांडण टाळले तर बरे होईल. घाईघाईने निर्णय न घेणेच चांगले. कुटुंबात काही धार्मिक कार्यक्रम होऊ शकतात.

ज्या व्यक्तींचा जन्म ५, १४, २३ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ५ आहे. या मूलांकाचा स्वामी बुध आहे. जीवनात सुखसोयी वाढतील. काम पूर्ण होईल. व्यवसायात विस्तार होऊ शकतो. प्रभावशाली लोकांशी ओळख वाढेल, जी भविष्यात फायदेशीर ठरेल. अनावश्यक खर्चापासून दूर राहा अन्यथा मासिक बजेट बिघडू शकते. सुख-समृद्धीने मन प्रसन्न राहील.

ज्या व्यक्तींचा जन्म ६, १५, २४ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ६ आहे. या मूलांकाचा स्वामी शुक्र आहे. नोकरीत बढती आणि पगारात वाढ होऊ शकते. व्यावसायिकांनाही अपेक्षित परिणाम मिळू शकतात. कामाच्या ठिकाणी चांगली प्रगती होईल. आर्थिक बाबतीत अचानक सुखद परिणाम मिळू शकतील. संपत्तीत वाढ होईल. जोडीदारासोबत संबंध चांगले राहतील.

ज्या व्यक्तींचा जन्म ७, १६, २५ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ७ आहे. या मूलांकाचा स्वामी केतु आहे. करिअरमध्ये प्रगतीच्या संधी मिळतील. योग्य निर्णय घेतल्यास फायदेशीर ठरू शकतात. जीवनात आनंद वाढेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. कामाच्या ठिकाणी अहंकाराचे भांडण टाळल्यास चांगले परिणाम मिळतील. व्यावहारिक निर्णय घेतल्यास सुख-समृद्धी वृद्धीची संधी प्राप्त होऊ शकेल.

ज्या व्यक्तींचा जन्म ८, १७, २६ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ८ आहे. या मूलांकाचा स्वामी शनी आहे. इच्छित परिणाम मिळाल्याने आनंदी व्हाल. पद आणि प्रतिष्ठा वाढेल. व्यस्ततेमुळे वैयक्तिक जीवन प्रभावित होईल. आर्थिक आघाडीवर संयम ठेवण्याची गरज आहे. कामाच्या ठिकाणी हवे असलेले बदल साध्य करण्यासाठी जास्त वेळ लागेल. प्रोजेक्टमध्ये समस्या वाढू शकतात. चांगली बातमी मिळू शकेल.

ज्या व्यक्तींचा जन्म ९, १८, २७ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ९ आहे. या मूलांकाचा स्वामी मंगळ आहे. गुंतवणुकीतून लाभ होईल. व्यवहार काळजीपूर्वक करा, अन्यथा नुकसान होऊ शकते. विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगले यश मिळू शकते. फिटनेसकडे लक्ष द्या. आत्मविश्वास वाढेल. कामातील आव्हानांवरही मात करू शकाल. आर्थिक प्रगतीच्या अनेक संधी उपलब्ध होतील. लाभही होतील. विनाकारण धावपळ करावी लागू शकते. - सदर माहिती सामान्य गृहितके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, तुमच्या मूलांकाविषयी जाणून घेण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जाते.