बुध-शुक्राचे गोचर: ७ राशींना उत्तम, उत्पन्न वाढेल; यश-प्रगतीची अपार संधी, शिव शुभ करतील!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2024 11:09 AM2024-03-05T11:09:52+5:302024-03-05T11:20:51+5:30

बुध आणि शुक्र हे दोन्ही ग्रह एकाच दिवशी राशीपरिवर्तन करत असून, नेमक्या कोणत्या राशींना लाभ मिळू शकेल? जाणून घ्या...

०७ मार्च २०२४ रोजी बुध आणि शुक्र हे दोन्ही ग्रह एकाच दिवशी राशीपरिवर्तन करणार आहेत. या दोन्ही ग्रहांना ज्योतिषशास्त्रात महत्त्वाचे स्थान आहे. या दोन्ही ग्रहांचा शुभ प्रभाव उत्तम लाभदायक ठरू शकतो, असे सांगितले जाते.

विशेष म्हणजे महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला हे दोन्ही ग्रह राशीपरिवर्तन करणार आहेत. बुध कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करणार आहे. तर, शुक्र मकर राशीतून कुंभ राशीत विराजमान होणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे बुध आणि शुक्र हे दोन्ही ग्रह मार्च महिन्यात दोनवेळा राशीपरिवर्तन करणार आहेत.

शुक्र आणि बुध ग्रहाच्या गोचरामुळे कुंभ राशीत शुक्र आणि शनी यांचा युती योग जुळून येईल. तर, मीन राशीत बुध आणि राहु यांचा युती योग जुळून येणार आहे. बुध आणि शुक्र ग्रहाच्या गोचराचा कोणत्या राशींना शुभ लाभ मिळू शकेल, महादेवांच्या कृपेने आगामी काळ अनुकूल ठरू शकेल, ते जाणून घ्या...

वृषभ: शुक्र आणि बुध गोचराने आर्थिक स्थितीत वाढ होईल. बँक बॅलन्स पूर्वीपेक्षा खूप चांगला असेल. करिअरमध्ये अनेक चांगल्या संधी मिळतील. अधिक कमाईच्या खूप चांगल्या संधी मिळू शकतील.

मिथुन: महादेवाच्या कृपेने धनलाभाचे योग जुळून येऊ शकतात. उद्योगपतींसाठी काळ चांगला मानला जात आहे. पैसा येईल. कर्जापासून मुक्तता मिळेल. कुटुंबासोबत प्रवासाची योजना आखू शकता. गुंतवणुकीसाठी काळ शुभ मानला जात आहे. भाग्याची उत्तम साथ मिळू शकेल. नवीन नोकरीची ऑफर मिळू शकेल.

सिंह: बुध आणि शुक्राचे राशीपरिवर्तन लाभदायक मानले जात आहे. या दोन्ही ग्रहांच्या शुभ प्रभावामुळे व्यावसायिकांना नफा मिळण्याची शक्यता आहे. आयुष्यात येणाऱ्या अडचणी हळूहळू दूर होऊ लागतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. तणावमुक्त, आनंदी राहण्यासाठी निसर्गात वेळ घालवा. आरोग्याची काळजी घ्यावी.

कन्या: बुध आणि शुक्राचे एकाच दिवशी होणार गोचर लाभदायक ठरणार आहे. सरकारी नोकरी करणाऱ्यांना चांगली बातमी मिळू शकते. व्यवसायाची परिस्थिती चांगली राहील. तब्येतीची काळजी घ्या. आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकते. मन उपासनेवर केंद्रित ठेवणे चांगले राहील.

तूळ: शुक्र आणि बुधाचे गोचर शिक्षण आणि करिअरमध्ये यश मिळवून देईल. लव्ह लाइफ चांगली जाऊ शकेल. नात्यात पूर्वीपेक्षा जास्त प्रेम आणि आदर असेल. विरोधक पराभूत होतील. एखाद्या वादविवादात विजयी होऊ शकाल.

वृश्चिक: बुध आणि शुक्र गोचराचा लाभ मिळू शकेल. संपत्ती वृद्धीचे योग जुळून येऊ शकतील. सुख प्राप्त होईल. ज्यांना वाहन खरेदी करायचे आहे त्यांची इच्छा यावेळी पूर्ण होऊ शकते. सासरच्या लोकांकडून फायदा आणि पाठिंबा दोन्ही मिळू शकेल.

कुंभ: शुक्र आणि बुधचे परिवर्तन प्रेम जीवनासाठी चांगले राहील. भौतिक सुखसोयींचा लाभ मिळेल. कमाईत वाढ होण्याचीही शक्यता आहे. कुटुंबाकडून सहकार्य आणि पाठिंबा दोन्ही मिळेल. गुंतवणुकीत आणि जमा झालेल्या संपत्तीतही वाढ दिसून येईल.

- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.