Ultraviolette F77: उरले फक्त 3 दिवस! 24 नोव्हेंबरला लॉन्च होणार 300KM रेंज देणारी इलेक्ट्रिक बाइक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2022 05:38 PM2022-11-21T17:38:58+5:302022-11-21T17:42:43+5:30

Ultraviolette F77 Booking and Features: कंपनीने गेल्या महिन्यात फक्त 10 हजार रुपयांमध्ये या गाडीसाठी बुकिंग सुरू केली होती.

307KM range Electric Bike: लवकरच भारतीय इलेक्ट्रिक वेहिकल मार्केटमध्ये एक पॉवरफूल इलेक्ट्रिक बाइक लॉन्च होत आहे. अल्ट्रावॉयलेट ऑटोमोटिव्ह 24 नोव्हेंबर रोजी आपली नवीन इलेक्ट्रिक स्पोर्ट्सबाइक Ultraviolette F77 लॉन्च करत आहे. काही दिवसांपूर्वीच कंपनीने ही बाइक जगासमोर आणली होती.

विशेष म्हणजे, या बाइकचे प्रोडक्शन सुरू करण्यापूर्वी यावर 5 वर्षे रिसर्च करण्यात आला आहे. ही इलेक्ट्रिक बाइक जबरदस्त लूकसोबत सर्वाधिक रेंज देते. फूल चार्जमध्ये ही बाइक तब्बल 300 किमीपेक्षा जास्तीची रेंज ऑफर करते. कंपनीने गेल्या महिन्यात या बाइकची बुकिंग सुरू केली होती. ग्राहक ही बाइक फक्त 10 हजार रुपयांमध्ये बूक करू शकतात.

अल्ट्रावॉयलेट ऑटोमोटिव्हने दावा केला आहे की, ही इलेक्ट्रिक बाइक तीन व्हेरिएंटमध्ये लॉन्च होत आहे. एअरस्ट्राइक, लेजर आणि शॅडो असे हे तीन व्हेरिएंट असतील. Ultraviolette F77 इलेक्ट्रिक बाइकचे हे तीन व्हेरिएंट वेगवेगळ्या स्पेसिफिकेशन आणि परफॉर्मेंससह येतील. या इलेक्ट्रिक बाइकला हल्क्या फ्रेमवर बनवले आहे, ज्यामुळे स्टेबल हँडलिंग मिळते.

कंपनीने या पॉवरफूल इलेक्ट्रिक बाइकची बुकिंग सुरू केल्यानंतर Ultraviolette Automotive ने दावा केला आहे की, आतापर्यंत F77 साठी 190 देशांमधून 70,000 पेक्षा जास्त प्री-ऑर्डर मिळाले आहे. आतापर्यंत हा आकडा आणखी वाढला असेल. यातून असे दिसून येते की, कंपनीच्या या बाइकला ग्राहकांकडून चांगलाच रिस्पॉन्स मिळत आहे.

Ultraviolette F77 ड्युअल-चॅनल ABS, अॅडजस्टेबल सस्पेंशन, मल्टीपल ड्राइव्ह मोड्स आणि रीजेनरेटिव्ह ब्रेकिंगसारख्या फीचर्ससह येईल. यात टीएफटी स्क्रीनसह एक पोर्टेबल फास्ट चार्जर, स्टँडर्ड चार्जर, व्हील कॅप, होम चार्जिंग पॉड, क्रॅश गार्ड, पॅनियर आणि एक वायजर असेल.