जिंतूरात दुचाकी-ट्रकच्या अपघातात बहीण-भावाचा जागीच मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 16:12 IST2018-07-16T16:08:17+5:302018-07-16T16:12:44+5:30
ओव्हरटेक करताना रस्त्यातील खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात दुचाकी घसरून ट्रक खाली आल्याने झालेल्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी १ वाजता परभणी रोडवर घडली.

जिंतूरात दुचाकी-ट्रकच्या अपघातात बहीण-भावाचा जागीच मृत्यू
जिंतूर (परभणी ) : ओव्हरटेक करताना रस्त्यातील खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात दुचाकी घसरून ट्रक खाली आल्याने झालेल्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी १ वाजता परभणी रोडवर घडली. लक्ष्मण सुदाम खरात (१८ ) व मनीषा रामप्रसाद पाचंगे (२४ ) असे मृतांची नावे असून ते मावस बहीण-भाऊ होते.
याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, तालुक्यातील कोरवाडी येथील लक्ष्मण खरात हा त्याची मावस बहीण बहीण मनीषा पाचंगे हिला दुचाकीवरून माहेरी सोडण्यास जात होता. या दरम्यान जिंतूर शहरालगत परभणीकडे जाणाऱ्या समोरील ट्रकच्यापुढे (एमएच 18 - बीए- 0506) जाण्याचा लक्ष्मण याने प्रयत्न केला. यात रस्तामधील खड्डा चुकवतात त्याची गाडी घसरली व ते दोघेही गाडीसह ट्रकच्या मागील चाकाच्या खाली आले. यात लक्ष्मण आणि मनीषा या दोघांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात एवढा भीषण होता कि यात दोघांचे मृतदेह छिन्नविछिन्न झाली होती. यामुळे त्यांची ओळख पटण्यास तब्बल तीन तास लागले.