इलेक्ट्रिक तार तुटल्याने दोन तास रेल्वे वाहतूक खोळंबली; ढेंगळी पिंपळगाव ते सेलूदरम्यान बुधवारी रात्रीचा प्रकार

By प्रसाद आर्वीकर | Published: November 22, 2023 11:53 PM2023-11-22T23:53:22+5:302023-11-22T23:53:31+5:30

तिरुपतीहुन जालनाकडे धावणाऱ्या रेल्वे इंजिनमध्ये ढेंगळी पिंपळगाव ते सेलूदरम्यान इलेक्ट्रिक वायर गुंडाळले गेल्याने रेल्वे थांबवली.

Railway traffic was disrupted for two hours due to the breakdown of electric wires | इलेक्ट्रिक तार तुटल्याने दोन तास रेल्वे वाहतूक खोळंबली; ढेंगळी पिंपळगाव ते सेलूदरम्यान बुधवारी रात्रीचा प्रकार

इलेक्ट्रिक तार तुटल्याने दोन तास रेल्वे वाहतूक खोळंबली; ढेंगळी पिंपळगाव ते सेलूदरम्यान बुधवारी रात्रीचा प्रकार

प्रसाद अर्विकार

सेलू (परभणी): तिरुपतीहुन जालनाकडे धावणाऱ्या रेल्वे इंजिनमध्ये ढेंगळी पिंपळगाव ते सेलूदरम्यान इलेक्ट्रिक वायर गुंडाळले गेल्याने रेल्वे थांबवली. तब्बल दोन तासानंतर ही रेल्वे पुढे मार्गस्थ झाली. दरम्यान सेलू, ढेंगळी पिंपळगाव व देऊळगाव आवचार या ठिकाणी रेल्वे थांबवण्यात आल्या होत्या.

तिरुपती जालनाकडे जाणारी रेल्वे बुधवारी सायंकाळी ७:०५  ढेंगळी पिंपळगाव ते सेलूदरम्यान इंजीनमध्ये इलेक्ट्रिक काम सुरू असलेले वायर अडकल्याने ही रेल्वे थांबविण्यात आली. याबाबतची माहिती पायलट यांनी सेलू स्टेशन मास्तर सोमनाथ राऊत यांना दिली. त्यानंतर संबंधित कामगार व आरपीएफ सपोउपनी संजय सुरवडे हे घटनास्थळी दाखल झाले. ९:१० वा. वायर काढल्यानंतर तिरुपती पुढे सेलूकडे मार्गस्थ झाली.

सेलू स्थानकावर मराठवाडा एक्सप्रेस तर ढेंगळी पिंपळगाव येथे नंदिग्राम आणि देऊळगाव अवचार येथे देवगिरी एक्सप्रेस या गाड्या थांबवण्यात आल्या होत्या. या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये एकच धांदल उडाली होती. सेलू स्थानकावर जीआरपी पोलीस आमलदार पि.जी. सूर्यवंशी, आरपीएफ पोलीस कर्मचारी व्ही.जी. गायकवाड यांनी चोख व्यवस्था ठेवली होती. हा प्रकार नेमका कसा झाला हे मात्र समोर आले नाही.

Web Title: Railway traffic was disrupted for two hours due to the breakdown of electric wires

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.