परभणीत उपमुख्य कार्यकारी अधिकाºयांना अंगणवाडी सेविकांनी कोंडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 00:31 IST2017-11-28T00:30:42+5:302017-11-28T00:31:13+5:30
अंगणवाडी सेविकेच्या आत्महत्येस कारणीभूत असलेल्या पर्यवेक्षिकेला निलंबित करण्याच्या मागणीसाठी जिल्हाभरातील अंगणवाडी सेविकांनी सोमवारी जि़प़चे मुख्य प्रवेशद्वार बंद करून महिला व बालविकास विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाºयांना सीईओंच्या कक्षात कोंडले़ पदाधिकाºयांच्या हस्तक्षेपानंतर पर्यवेक्षिका ए़ए़ गुंजोटीकर यांना निलंबित करण्यात आल्याची घोषणा केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले़

परभणीत उपमुख्य कार्यकारी अधिकाºयांना अंगणवाडी सेविकांनी कोंडले
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : अंगणवाडी सेविकेच्या आत्महत्येस कारणीभूत असलेल्या पर्यवेक्षिकेला निलंबित करण्याच्या मागणीसाठी जिल्हाभरातील अंगणवाडी सेविकांनी सोमवारी जि़प़चे मुख्य प्रवेशद्वार बंद करून महिला व बालविकास विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाºयांना सीईओंच्या कक्षात कोंडले़ पदाधिकाºयांच्या हस्तक्षेपानंतर पर्यवेक्षिका ए़ए़ गुंजोटीकर यांना निलंबित करण्यात आल्याची घोषणा केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले़
पंचायतराज समितीच्या दौºयाच्या पार्श्वभूमीवर जिंतूर तालुक्यातील नागणगाव येथील अंगणवाडी सेविका सुमित्रा भगवान राखुंडे यांना पर्यवेक्षिका व तालुका महिला व बालविकास अधिकारी यांनी २००८ पासूनचे रेकॉर्ड सादर करण्यास सांगितल्याने व तसे रेकॉर्ड उपलब्ध नसल्याने या दबावातून त्यांनी ७ नोव्हेंबर रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती़ मयत अंगणवाडी सेविका राखुंडे यांच्याकडे सापडलेल्या चिठ्ठीत त्यांच्यावर कशा प्रकारे दबाव आला, दिरंगाईने मिळणारे त्रोटक मानधन, मानधन मिळत नसतानाही अंगणवाडी चालविण्यासाठी केलेली कसरत, रेकॉर्ड का उपलब्ध नाही, याबाबतची माहिती नमूद करण्यात आली होती़ राखुंडे यांनी तेथील पर्यवेक्षिका व महिला व बालविकास अधिकाºयांच्या दबावातून आत्महत्या केल्याचा आरोप करून त्यांना निलंबित करावे, या मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघाने ८ नोव्हेंबर रोजी दिले होते़ त्यानंतर २० नोव्हेंबर रोजीही या प्रकरणी कारवाई न झाल्यास २७ नोव्हेंबर रोजी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता़ परंतु, या निवेदनाची दखल न घेतल्याने सोमवारी सकाळपासून जिल्हाभरातील अंगणवाडी सेविकांनी प्रदेशाध्यक्ष भगवानराव देशमुख, जिल्हाध्यक्ष बाबाराव आवरंगड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन केले़